sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : जिल्हा परिषदेच्या ४३२ पदांची ७ ऑक्टोबरला परीक्षा

वरिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहायकांची तीन सत्रांत होणार ऑनलाइन परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या ४३२ पदांची परीक्षेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. ७ ऑक्टोबरला वरिष्ठ सहाय्यक (लेखा), ८ रोजी विस्तार अधिकारी (सां.) १० रोजी विस्तार अधिकारी (कृषी) तर ११ ऑक्टोबरला कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांसाठी तीन सत्रांत ऑनलाइन परीक्षा पार पडणार आहे.

जिल्हा परिषदेतर्फे ५ ऑगस्टला ४३२ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात एकूण ४३२ रिक्तपदांसाठी १८ हजार ५०० अर्ज आले आहेत. दरम्यान, या परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले असून ७ ऑक्टोंबरपासून विविध रिक्तपदांच्या जागेसाठी ऑनलाइन परीक्षा पार पडणार आहेत.

सदर ऑनलाइन परीक्षेची माहिती पुस्तिका व प्रवेश पत्र जिल्हा परिषद aurangabadzp.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांनी प्रवेश पत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले आहे.

अर्ज शुल्कातून जिल्हा परिषदेला दोन कोटी

जिल्हा परिषदेतील विविध ४३२ रिक्तपदांसाठी १८ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात सर्व संवर्गाच्या पदांकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १ हजार रुपये आणि राखीव अथवा मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. यातून जवळपास दोन कोटी रुपये जिल्हा परिषदेला शुल्कापोटी मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT