medicines sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : बनावट औषधी विक्रीचा पर्दाफाश शहरात आढळला युरिमॅक्स- डीचा बनावट साठा

अन्न व औषधी विभागाने या कंपनीतील औषधी सील करून २४ युरिमॅक्स औषधींच्या स्ट्रीप ताब्यात घेतल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - सौम्य प्रोस्टॅटीक हायपरप्लासिया या प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधीत आजारावरील रुग्णांच्या उपचारासाठी युरिमॅक्स- डी हे औषधी दिले जाते. मात्र, या औषधी बनावट स्वरूपात विकण्यात येत असल्याच्या माहितीवरुन अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी बन्सीसलालनगर येथे छापा मारुन कारवाई केली. या कारवाईत बनावट औषधी साठा तसेच डी.के. फार्मा कंपनीचे मालक, तसेच सदर औषधींचा पुरवठा करणाऱ्या बिहारच्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट औषधी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. बन्सीलालनगर भागातील श्रीराम कॉम्प्लेक्स येथील डीके फार्मा या कंपनीतून हा माल पुरवठा केला जात होता. या माहितीआधारे अन्न व औषध निरीक्षक बळीराम मरेवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. दहा) डी. के. फार्मा या कंपनीतून शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी पुरवठा होत असलेल्या युरिमॅक्स डी या गोळ्यांची (औषधी) तपासणी केली. तपासणीत सदर औषधी या बनावट असल्याची माहिती समोर आली.

अन्न व औषधी विभागाने या कंपनीतील औषधी सील करून २४ युरिमॅक्स औषधींच्या स्ट्रीप ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी डी. के. फार्माचे संजय गर्ग, विनीत कुमार, एक महिला, मे मार्स फार्मा लाईन बाजार बिहार व इतर काही जणांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक उत्रेश्वर मुंडे हे करत आहेत.

बिहारहून मालाचा पुरवठा

प्रकरणात प्राथमिक माहितीनुसार, श्रीराम कॉम्प्लेक्स मधील एजन्सीने युरीमॅक्स डी टॅबलेटसची ऑर्डर दिल्लीला दिली होती. या एजन्सीला ऑर्डर प्लेस झाल्यानंतर बिहार येथील मार्स फार्मा पुनिया येथून मालाचा पुरवठा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT