sambhjai nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : बेकायदा मोबाइल टॉवरचा सुळसुळाट! ७१६ पैकी तब्बल ६५३ टॉवर अनधिकृत

त्याला अनेक मोबाइल टॉवर कंपन्यांनी न्यायालयात आव्‍हान दिलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहरात विविध मोबाइल कंपन्यांचे ७१६ टॉवर असून, यातील फक्त ६७ टॉवर नियमित आहेत तर ६५३ मोबाइल टॉवर अनधिकृत आहेत. त्यांच्याकडे ८२ कोटी ७७ लाखांचा कर थकला आहे. कर भरल्यानंतर अनधिकृत टॉवर नियमित केले जाणार आहेत. त्यासाठी ज्या इमारतीवर टॉवर उभारण्यात आले आहेत, त्या इमारती नियमित कराव्यात, अशी सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (ता. १९) केली.

शहर परिसरात बेकायदा मोबाइल टॉवरचे जाळे उभे राहिले आहे. मोबाइल टॉवर लावताना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, रात्री-अपरात्री मोबाइल कंपन्या टॉवर उभारत आहेत. त्यानंतर अशा टॉवरचा शोध घेऊन महापालिका कर आकारणी करते.

त्याला अनेक मोबाइल टॉवर कंपन्यांनी न्यायालयात आव्‍हान दिलेले आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात ७१६ मोबाइल टॉवर आहेत. त्यापैकी फक्त ६७ जणांनी महापालिकेची परवानगी घेतलेली आहे. मोबाइल टॉवर कंपन्यांकडे ८२ कोटी ७७ लाख रुपयांचा कर थकलेला आहे. त्यामुळे गुरुवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी आढावा बैठक घेतली. मोबाइल टॉवर ज्या इमारतींवर उभारण्यात आले आहेत, त्या इमारती नियमित आहेत का? याची तपासणी करावी.

इमारती अनधिकृत असतील तर त्या नियमित करण्याची कार्यवाही करावी. त्यानंतर मोबाइल टॉवर नियमित करण्याची कार्यवाही करावी. मोबाइल टॉवर सील अथवा काढून घेण्याची कारवाई न करता त्यांना नियमित करून त्यांच्याकडील कर वसूल करावा, अशी सूचना जी. श्रीकांत यांनी केली. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

‘नीचे दुकान, उपर मकान’साठी अग्निशमन यंत्रणा आवश्‍यक

शहराच्या अनेक भागात ‘निचे दुकान, उपर मकान’ अशी अवस्था आहे. अशा मालमत्तांना अग्निशमन विभागाची एनओसी घेणे बंधनकारक आहे. १५ मीटरपर्यंत उंचीच्या हॉस्पिटल, शाळा, व्यावसायिक इमारतींमध्ये आग आटोक्यात आणण्याचे उपकरण लावणे गरजेचे आहे; अन्यथा दंडात्मक कारवाई करावी. २४ मीटर उंचीपर्यंतच्या निवासी इमारतींना फायर एनओसीची आवश्यकता नाही, असे यावेळी प्रशासकांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

मोठी बातमी! पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ महिन्यात; मैदानी चाचणी फेब्रुवारी-मार्चअखेर संपणार, लेखी परीक्षेसाठी १:१० उमेदवारांची निवड, वाचा...

SCROLL FOR NEXT