sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : दहा दिवसांत काढून दिले दीड लाख ‘गोल्डन कार्ड’!

‘आशा’ स्वयंसेविकांनी केले प्रयत्न गरिबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ व राज्याची महत्वाकांक्षी ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’च्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना विविध आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो. या योजनेचा जनतेला लाभ मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या ‘आशा’ स्वयंसेविकांनी कंबर कसली असून अवघ्या दहाच दिवसात दीड लाख लाभार्थ्यांना ‘गोल्डन कार्ड’ काढून दिले आहेत

जिल्ह्यात आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजनेचे १० लाख लाभार्थी असून त्यापैकी जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील ५ लाख ७० हजार एवढे लाभार्थी आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत २ लाख ३५ हजार ३७३ लाभार्थ्यांनी ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ काढले आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ हजार ८३३ आशा स्वयंसेविकांनी १० दिवसांत सूक्ष्म नियोजन करून गावपातळीवर लाभार्थ्यापर्यंत पोचून १ लाख ५९५ लाभार्थ्याचे गोल्डन कार्ड काढले आहेत. त्यासाठी त्यांना आशा गटप्रवर्तक, आशा तालुका समन्वयक व जिल्हा आशा समन्वयक व जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

कार्ड काढण्यासाठी गृहभेटी

या अगोदर मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले होते. यावर आता राज्य सरकारने दोन कोटी कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्यातील सर्व आरोग्य विभागातील यंत्रणा व आशा सेविकांमार्फत गृहभेटी व गावोगावी शिबिरे आयोजित करत हे कार्ड करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ३० रुग्णालयात मिळतो लाभ

सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवरील शस्त्रक्रिया करता याव्यात व त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३० रुग्णालयात याच लाभ देण्यात येत आहे. यात प्रत्येक तालुक्यामध्ये तर शहरात मोठे रुग्णालय यात समाविष्ट आहेत.

तालुका गोल्डन कार्ड

छत्रपती संभाजीनगर१२,०५८

गंगापूर १२,२५७

कन्नड १४,२००

खुलताबाद ४,४१२

पैठण १०,३७६

फुलंब्री ७,६३८

सिल्लोड १७,१४५

सोयगांव ५,७०६

वैजापूर १६,८०३

दोन लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या कार्डची नोंदणी झाली आहे. यात त्यांनी आपला मोबाईल नंबर, आधार कार्ड व नाव देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.

- डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT