sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : आजारी नातेवाइकाला पहायला आले ; अन् दागिने चोरून नेले!

मला जायचे म्हणून आवराआवर करू लागली असता, फिर्यादी सुनीता ही ‘तुला सकाळी रेल्वेने बसवून देते असे म्हणाली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - आजारी नातेवाइकाला बघायला गेलेल्या मायलेकांनी चक्क दागिन्यांसह रोकड असा ३६ हजार ४०३ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ११ सप्टेंबररोजी रात्रीच्या सुमारास जरीपुरा, गांधीनगरात घडली होती. याप्रकरणी दोघा मायलेकरांविरोधात क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रवी सौदे (वय २५, रा. सोलाराम फ्लॅट.२, हैदराबाद) असे चोरट्याचे नाव आहे.

याप्रकरणी सुनीता रामकुमार रिडलॉन यांनी (५४, रा, जरीपुरा, गांधीपुरा) फिर्याद दिली. त्यानुसार त्यांची आई आजारी आहे. त्यांच्या आजारी आईला पाहण्यासाठी फिर्यादी सुनीता हिच्या भावाची सून ममता रवी सौदे आणि रवी सौदे (रा. सोलाराम फ्लॅट, हैदराबाद) हे दोघे हैद्राबादेतून ११ सप्टेंबर रोजी आले होते. ते दोघे दोन दिवस राहिल्यानंतर १४ सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजता ममता उठली.

मला जायचे म्हणून आवराआवर करू लागली असता, फिर्यादी सुनीता ही ‘तुला सकाळी रेल्वेने बसवून देते असे म्हणाली. त्यावर माझ्या आईची तब्येत खराब आहे, मला आताच जावे लागेल म्हणत ममताने मुलासह घर सोडले. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी फिर्यादी सुनीता यांनी पैसे घेण्यासाठी कपाट उघडले असता, त्यांना दोन हजारांची रोकड आणि २६ हजार ४०३ रुपयांचे सोन्याचे कानातले तसेच आठ हजार रुपयांची अंगठी असा ३६ हजार ४०३ रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT