Chh. Sambhajinagar 
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : दंगल प्रकरणी तरुणांची धरपकड बंद करा; 'जमियत उलेमा-ए-हिंद'ची मागणी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा भागात रमजान महिन्यात तसेच राम नवमीच्या आदल्या रात्री झालेल्या दंगलीला ५० दिवस उलटुन गेले आहे. त्यात आतापर्यंत ७६ तरुणांना अटक करण्यात आली. हे अटकसत्र अद्यापही थांबले नसून काही तरुणांना अटक केली जात आहे.

या प्रकरणात निरापराध तरुणांना अटक करणे थांबवावे नसता आंदोलन करणार असल्याची माहिती जमियत उलेमा ए हिंद (अर्शद मदनी) यांच्यातर्फे शुक्रवार (ता.१९) रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी ते म्हणाले, निरापराध तरुणांना अटक केली गेली असल्याने त्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. आता यामध्ये काही तरुणांची नावे फक्त सुड उगविण्यासाठी सांगितली जात आहे. मात्र यामध्ये पोलिसांनी पुर्ण शहानिशा करुन अटक केली पाहिजे.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना माहिती देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी लिगल सेलचे अध्यक्ष मुस्तफा खान, उपाध्यक्ष हाफीज इक्बाल अन्सारी, अॅड. शेख नवाब, अॅड. तौफीक अहेमद यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT