chhatrapati sambhaji nagar weather update summer heat wave temperatures rise 40 degree health
chhatrapati sambhaji nagar weather update summer heat wave temperatures rise 40 degree health  esakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar Weather : हाय रे गर्मी! शहरात उष्णतेची लाट, पारा चाळिशीपार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच शहराचे तापमान ४० च्या पुढे गेले. मंगळवारी (ता. १६) ४०.५ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानसुद्धा २६.६ अंश नोंदले गेले. काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमान ३५ ते ३९ अंशांदरम्यान होते. शनिवारी (ता. १३) ते ३५.४ अंशांवर होते.

त्यानंतर यात वाढ होऊन सोमवारी तापमान ३९.३ अंशांवर आले. मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने त्याचा जनजीवनावर परिमाण झाला. बाजारपेठांत दुपारच्या वेळेस गर्दी कमी होत आहे. बहुतांश जण खरेदीसाठी रात्रीच्या वेळेस पसंती देत आहेत. उन्हामुळे शीतपेय, ज्यूस व उसाच्या रसाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

उष्णतेमुळे होणारा त्रास

  • उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटतात.

  • हातापायाला गोळे व चक्कर येते.

  • तापमान १०६ वर गेल्यास मृत्यूची शक्यता.

बचाव करण्यासाठी हे करा

  • पुरेसे पाणी प्यावे. पाणी सोबत ठेवावे.

  • हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरावे.

  • उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावे.

  • उन्हात टोपी/हॅट खाली ओलसर कपडा ठेवावा.

  • पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवावे.

  • कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावीत.

  • ओलसर पडदे, पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करू नका

  • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.

  • पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

  • गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका.

  • उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा.

  • स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.

  • मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

उष्णतेचा त्रास कुणाला?

  • उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक.

  • वृद्ध आणि लहान मुले.

  • स्थूल लोक, अयोग्य कपडे घालणारे.

  • पुरेशी झोप न झाल्यास.

  • गर्भवती महिला.

  • अनियंत्रित मधुमेह.

  • हृदयरोग असणारे.

  • अपस्मार रुग्ण.

  • दारूचे व्यसन असणारे.

  • काही विशिष्ट औषधे घेणारे.

  • निराश्रित, बेघर नागरिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT