Harsul Lake Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : जुन्या शहराची तहान भागणार; अवकाळीमुळे ‘हर्सूल’ची वाढली पातळी

अत्यल्प पावसामुळे यंदा पावसाळ्यात जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारा हर्सूलचा तलाव पूर्णपणे भरलाच नाही.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - अत्यल्प पावसामुळे यंदा पावसाळ्यात जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारा हर्सूलचा तलाव पूर्णपणे भरलाच नाही. असे असले तरी रविवार व सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत अर्धा फुटाने वाढ झाली आहे. सध्या तलावात पाण्याचा ओघ सुरूच असून, एखाद्या फुटापर्यंत पाणी पातळी वाढेल, असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे शहराला काहीसा दिलासा मिळाला आहे.

हर्सूल तलावातून जुन्या शहरातील १४ वॉर्डांना पाणी पुरवठा केला जातो. जायकवाडी धरणातून असलेल्या दोन्ही योजना जुन्या झाल्याने वारंवार तांत्रिक बिघाड येत आहे. त्यात हर्सूलच्या पाण्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला काहीसा दिलासा मिळत आहे.

सध्या तलावातून दररोज सात ते साडेसात एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. याठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने पाण्याचा उपसा वाढविता येत नव्हता. त्यामुळे महापालिकेने सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू केले आहे.

काम अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण झाल्यानंतर तलावातून दररोज १२ ते १३ एमएलडीपर्यंत पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहराला काहीसा दिलासा मिळेल.

सध्या तलावात १५ फूट पाणी

महापालिकेने हर्सूल तलावातील पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी यंत्रणा उभारली असली तरी यंदा अत्यल्प पावसामुळे तलाव क्षमतेने भरला नव्हता. सध्या तलावात सध्या १५ फूट पाणी आहे. त्यात रविवारी, सोमवारी रात्री शहर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले.

या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र फायदा झाला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे हर्सूल तलावाची पाणीपातळी अर्धा फुटाने वाढली आहे. आणखी अर्ध्या फुटापर्यंत पाणी वाढेल, अशी अपेक्षा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला आहे.

दोन दिवस झालेल्या पावसामुळे हर्सूल तलावात पाण्याचा ओघ सुरू असून, आणखी अर्धा फूट पाणीपातळी वाढेल. त्यामुळे पाणीपातळी सोळ ते १७ फुटापर्यंत जाईल. हे पाणी मार्च, एप्रिलपर्यंत पुरेल.

- के. एम. फालक, कार्यकारी अभियंता महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT