छत्रपती संभाजीनगर

मत्स्यव्यावसायिकांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा आधार ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू;

CD
‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा आधार बीड : जिल्ह्यातील मच्छीमार आणि मत्स्यव्यावसायिकांना हक्काचा रोजगार तसेच आर्थिक बळ देण्यासाठी राबविण्यात येणारी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ आता पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी २.०’ पोर्टलवर अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरताना व्यावसायिकांची कोणतीही गैरसोय किंवा धावपळ होऊ नये, यासाठी बीड येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयात एक स्वतंत्र साहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. केंद्राच्या ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’च्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यात ही महत्त्वपूर्ण योजना राबविली जात आहे. या अंतर्गत ६ राज्यस्तरीय आणि १९ जिल्हास्तरीय अशा एकूण २५ विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, जुन्या ३ जिल्हास्तरीय योजनांमध्येही कालानुरूप आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. इच्छुक लाभार्थ्यांना आता स्वतःचा आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल. याव्यतिरिक्त ज्यांना तांत्रिक अडचण असेल, ते कार्यालयातील साहाय्यता कक्षाची थेट मदत घेऊ शकतात. ----- कोट : जिल्ह्यातील मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मत्स्य विक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. अर्ज प्रक्रियेत कोणालाही तांत्रिक अडचण येऊ नये आणि ही प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ व्हावी, यासाठी कार्यालयात स्वतंत्र साहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. - भास्कर सानप, सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय), बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: “आम्ही सहज जिंकू असं वाटलेलं, पण…”, भारताच्या २४४ धावांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांची गॅस वितरण कार्यालयाकडूनही लूट सुरू

SCROLL FOR NEXT