photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : लॉकडाउन संपताच नागरिक बेफिकीर 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद, ः शहरात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना काही नागरिकांना त्याचे गांभीर्य दिसत नाही. कडक संचारबंदीनंतर नागरीकांप्रमाणेच प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही बिनधास्त झाल्याचे चित्र आहे. सायंकाळी बाजारपेठ बंद झाल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर लॉकडाउनच्या काळाप्रमाणेच कारवाईची गरज आहे. 
शहरात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. त्यामुळेच १० ते १८ जुलै दरम्यान कडक लॉकडाउचा निर्णय घेण्यात आला होता. हा लॉकडाउन यशस्वीही झाला आहे. मात्र तो संपताच पुन्हा पहिल्यासारखी स्थिती होउ नये यासाठी गांभिर्याचे वातावरण टिकवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे जाणिवपुर्वक प्रयत्न आवश्यक आहेत. सायंकाळी सात वाजेनंतर रस्त्यावर पुन्ही संचारबंदी अपेक्षित आहे. त्याकडे प्रशासनाने डोळेझाक करू नये अन्यथा कडक लॉकडाउनच्या काळात जे कमावले ते वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 घोळके अन् जत्थे 

सायंकाळी सातपर्यंत दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वच दुकाने आणि व्यवहारही बंद होणे आवश्यक आहे. मात्र नागरिक उशिरापर्यंत फिरल्याशिवाय राहत नाहीत. सायंकाळी घोळक्या-घोळक्यांनी रस्त्यावर तरुणांचे जत्थे फिरताना दिसत आहेत. विविध चौकांमध्ये कॉलनीच्या गेटभोवती, वसाहतींच्या कोपऱ्यांवर विनाकारण भटकणाऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांचेही दुर्लक्ष 

लॉकडाउननंतर पोलिसांनी आता मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पूर्वीप्रमाणे चौकांमध्ये पोलिस दिसत नाही, त्यामुळे रस्त्यावर सायंकाळी आणि रात्रीपर्यंत वर्दळ कायम आहे. दिवसा दुकाने सुरू झाल्याने सुरु झालेली वर्दळ रात्रीही दिसत आहे. त्यामुळे सायंकाळी तरी पोलिसांनी गस्त वाढवून रिकामटेकड्यांना आवर घालण्याची गरज आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

विनामास्क बिनधास्त 

शहरात विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेतर्फे काही प्रमाणात कारवाई करण्यात येत असली तरीही त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेच नागरिकांत कारवाईची भीती राहिली नाही. परिणामी कोरोना संसर्गाचा धोकाही वाढला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

SCROLL FOR NEXT