छत्रपती संभाजीनगर

पुतळ्यांचे कामे वेळेत पूर्ण करा

CD
पुतळ्यांची कामे वेळेत पूर्ण करा - आढावा घेण्याचे महापौरांचे आयुक्तांना निर्देश - सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर ः भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे व अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे काम ठरविलेल्या माइल स्टोननुसार सुरू आहे का, याचा आढावा दोन दिवसांत आयुक्तांनी घ्यावा, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी शुक्रवारी (ता. १३) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले. नगरसेवक अमित भुईगळ यांच्यासह नगरसेवकांनी यासंदर्भात विषय उपस्थित केला होता. सात डिसेंबरपूर्वी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी भुईगळ यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागावर विसंबून न राहता महापालिकेने स्वतः लक्ष घालून पुतळ्यांची कामे पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली. त्यावर महापौरांनी यासंदर्भात वारंवार बैठका घेऊन आढावा घेतला. त्यात माइलस्टोन ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार कामे होत आहेत किंवा नाही, याचा आढावा दोन दिवसांत आयुक्तांनी घ्यावा, असे निर्देश दिले. ------ २० नोव्हेंबरपूर्वी पुतळा येणार यासंदर्भात खुलासा करताना शहर अभियंता संजय कोंबडे यांनी सांगितले, की सिव्हिलचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यावर महापौरांनी फक्त पुतळ्याचे काम महापालिकेमार्फत सुरू आहे. त्यानुसार २० नोव्हेंबरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथे आणण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT