Hingoli News sakal
छत्रपती संभाजीनगर

Hingoli News : दहा रुपयांच्या नाण्याबाबत ग्रामीण भागात संभ्रम ; बँकांसह संस्थांमार्फत जनजागृतीची गरज

प्रचलित चलनातील नाणे नाकारणे म्हणजे आरबीआयच्या नियमाने हा गंभीर गुन्हाच आहे. परंतु, तरीदेखील सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील काही गावखेड्यांमध्ये दहा रुपयांची नाणे घेण्यास ग्राहकांकडून नकार दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : प्रचलित चलनातील नाणे नाकारणे म्हणजे आरबीआयच्या नियमाने हा गंभीर गुन्हाच आहे. परंतु, तरीदेखील सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील काही गावखेड्यांमध्ये दहा रुपयांची नाणे घेण्यास ग्राहकांकडून नकार दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. म्हणून ग्रामीण भागात याबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्रासपणे पाच किंवा दहा रुपयांची नाणे बाजारात प्रथम बहुतांश जणांचे आकर्षण ठरले. याच पार्श्वभूमीवर बहुतेक जणांनी दहा रुपयांची नाणे संग्रहित ठेवले. परंतु, बऱ्याच कालावधीनंतर हळूहळू पसरलेल्या अफवांमुळे दहा रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवाही झाल्या. त्याचाच परिणाम म्हणून सद्यःस्थितीत दहा रुपयांची नाणे म्हटले की, कुठलाही दुकानदार असो ग्राहक या दोघांसाठी डोकेदुखी होऊ लागली आहे.

दहा रुपयांच्या नाण्यांबद्दल आजही ग्रामीण भागात विविध पद्धतीच्या अफवा आहेत. परंतु, ग्रामीण भागात आजही मोठे दुकानदार असो, वा व्यापारी यांच्याकडे हजारो रुपये दहाचे नाणे साठून आहेत. परंतु, एकाचवेळी ते द्यायचे झाल्यास या लोकांसाठी ते डोकेदुखी होऊ लागली.पर्यायी दहा रुपयांची नाणे घेण्यास टाळाटाळ का केली जाते. हा यक्ष प्रश्न मात्र, कायम आहे. एकूणच आजही हजारो रुपयांची दहा रुपयांची नाणे बहुतांश जणांकडे साठवून ठेवली आहेत. परंतु, ते घेणार कोण, असा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

ग्राहकांकडून आम्ही दहा रुपयांची नाणे घेतो. परंतु, ग्राहकांना दहा रुपयांची नाणे दिल्यास ते आमच्याकडे चालत नाहीत, असे म्हणून टाळाटाळ करतात. या बिकट परिस्थितीत ग्रामीण भागात बँकांमार्फत जनजागृती करण्याची गरज आहे.

- बबनराव बोधनकर, कापड व्यावसायिक.

रुपयांची नाणे चलनात आहेत. ते मुळीच बंद झालेली नाहीत. बँकेच्या काऊन्टरवर दहा रुपयांची नाणे स्वीकारल्या जातील. अशा आशयाच्या सूचनासुद्धा लिहिलेल्या असाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूर्वीच दिलेल्या आहेत. याबद्दल जनजागृती अभियान सर्वच बँकांमार्फत राबविले जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

- सटवाराव पोपते, व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT