छत्रपती संभाजीनगर

काँग्रेस कार्यकर्त्यांना नकोय महाविकास आघाडी 

शेखलाल शेख

औरंगाबादः महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील बहुतांश कार्यकर्त्यांना संधी मिळावी, पडत्या काळात पक्षासोबत राहिलेल्यांना तिकीट द्यावे तसेच जिल्हा परिषदेत शिवसेनेने दगाफटका केल्याने आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी नकोच असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. महाविकास आघाडीतर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देतांना शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली, सभापती पदाच्या निवडणुकीत देखील कॉंग्रेसला पद मिळू दिले नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवत शिवसेनेला धडा शिकवण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून महाविकास आघाडीला खो देण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेत सत्तार यांनी शिवसेनेचाच अध्यक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण ईश्‍वर चिठ्ठीने सत्तारांचे मनसुबे उधळले गेले. त्यानंतर विषय समिती सभापती पदाच्या वाटपात कॉंग्रेसला चांगले खाते मिळेल अशी अपेक्षा होती. पण ती देखील सत्तार यांनी फोल ठरवत आपल्या समर्थकांची वर्णी तिथे लावली.

शिवसेनेने दगाबाजी केल्याची भावना स्थानिक कॉंग्रेस नेते व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची झाली. त्याचे पडसाद रविवारी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेसच्या गांधी भवन येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत उमटले. 

कॉंग्रेसला हवे स्वबळ 

महाविकास आघाडी झालेली असतांना आणि वरिष्ठांनी तसे आदेश दिलेले असतांना देखील शिवसेनेच्या एका मंत्र्याने मनमानी केली, आणि वरिष्ठ पातळीवर देखील त्याला अभय देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ. कल्याण काळे यांनी आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. महाविकास आघाडीला अध्यक्षपद देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश देखील येणार होते. पण कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले आणि सध्या राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी आपले जुने हिशेब चुकते करण्याचे ठरवले आणि काळेंचा डाव फसला होता.

त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत न जाता स्वबळावर लढवण्याचा निर्धार कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेत केलेला भ्रष्टाचार हाच प्रमुख मुद्दा करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. शहरातील नागरी प्रश्‍न सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना आलेले अपयश, भ्रष्टाराचाराचे आरोप असे मुद्दे लोकांसमोर मांडून वेगळा पर्याय म्हणून कॉंग्रेसचा विचार केला जावा असे आवाहन प्रचारा दरम्यान करण्यात येणार आहे. 

कॉंग्रेस देणार नेत्यांना वॉर्डाची जबाबदारी 

प्रत्येक नेत्यांना त्या-त्या वॉर्डातून उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी देणार आहे. 21 जानेवारीनंतर इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येतील, त्या-त्या वॉर्डात संबंधित उमेदवाराच्या संदर्भात सर्व्हे केला जाईल, त्याचे रेटिंग तपासले जाईल, त्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल, शहरात एमआयएमचे प्राबल्य आहे, ही मानसिकता डोक्‍यातून काढून टाका असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. 

नेते ही म्हणतात महाविकास आघाडी नको 

राज्यात महाआघाडीचे सरकार असले तरी आपण महापालिकेची निवडणूक महाआघाडीसोबत न लढता स्वतंत्रपणे लढावी. सर्वच्या सर्व जागा लढवाव्यात. निवडणुकीनंतर महाआघाडी करावी. स्वतंत्र लढल्यास आपली ताकद दिसून येईल. लोकांची कामे करणाऱ्यांना लोक मत देतात. एमआयएम बेल्टमधील लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करा असे नेते म्हणत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT