छत्रपती संभाजीनगर : वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय नागपूर या विभागाच्या लघुलेखक पदासाठी ऑनलाइन लघुलेखन व्यावसायिक चाचणी परीक्षा रविवारी (ता. २९) शहरातील दोन केंद्रांवर पार पडली.
दुसऱ्यांदा ऑनलाइन स्वरूपात झालेली ही परीक्षा यावेळी सुधारणांमुळे निर्विघ्न पार पडली. चार सत्रांत २८८ विद्यार्थ्यांनी दोन्ही केंद्रांवर परीक्षा दिली. वसंतराव नाईक महाविद्यालयात १७१, तर ११७ उमेदवारांनी ॲक्टिव्ह इन्स्टिट्यूटवर परीक्षा दिली. यावेळी ६० विद्यार्थी गैरहजर होते.
वसंतराव नाईक महाविद्यालयात २०१ आणि ॲक्टिव्ह इन्स्टिट्यूट माहिती व तंत्रज्ञान केंद्रावर १४७ उमेदवारांच्या परीक्षेची चार सत्रांत व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी ३० विद्यार्थी गैरहजर होते.
यापूर्वी लघुलेखकांची लघुलेखनाची व्यावसायिक चाचणी ही परीक्षक उतारा वाचवून दाखवत, तो उतारा परीक्षार्थींना लिहून द्यावा लागत होता. गेल्यावर्षी ऑनलाइन प्रयोग झाला. मात्र, मोबाइलवर कनेक्ट ब्ल्यूटूथमध्ये उताऱ्याची क्लिप ऐकण्यात अडथळे येत होते.
यावर्षी पहिल्यांदा राज्य परीक्षा परिषदेने ब्ल्यूटूथ हेडसेटची व्यवस्था करून पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने परीक्षेची व्यवस्था केली होती. ती पद्धत यशस्वी झाल्याने विद्यार्थ्यांना निर्विघ्न परीक्षा देता आल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली.
यावर्षी चार मिनिटांची क्लिप ब्ल्यूटूथ हेडफोन डिव्हाइसद्वारे ऐकवली गेली. त्यानंतर संगणकावर पॅसेज टाइप करून ऑनलाइन सबमिट केला. यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषा माध्यमाची व्यवस्था होती. परीक्षेसाठी आयटी शिक्षक अमोल चव्हाण, रवींद्र पवार, स्नेहल कुलथे, राहुल पुंडकर, संजना सिंगल तसेच परीक्षा परिषदेचे प्रतीक आगेले आदींनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.