covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये संसर्ग कमी होतोय, पण स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन

महापालिका प्रशासकांचे नागरिकांना आवाहन

माधव इतबारे

औरंगाबाद: शहरातील कोरोना रुग्णांची (corona cases) संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केली. लॉकडाऊन (lockdown), लसीकरण (vaccination) व नागरिकांच्या शिस्तीमुळे दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

शहरात मार्च महिन्यात ३२ हजार रुग्ण तर एप्रिल महिन्यात ४१ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहरातील कोविड केअर सेंटर, खासगी, सरकारी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाले. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवून लसीकरणावर लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणाम रुग्णांची संख्या कमी होत आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्ण संख्या कमी होत आहे. मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या आता तीनशेच्या खाली आली आहे. लॉकडाऊन, लसीकरण आणि नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळेचे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात यश मिळत असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

असे असले तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी. मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटाईझरचा वापर करावा. लॉकडाऊन उघडल्यानंतरही नागरिकांनी स्वयंशिस्त पाळलीतरच दुसरी लाट थोपविण्यात यश मिळाले असे, म्हणता येईल, असे पांडेय यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT