3coronavirus_23
3coronavirus_23 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच; कोविड केअर सेंटरसह डीएससी, डीएचसीएस फुल्ल

शेखलाल शेख

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांनी कोविड केअर सेंटरसह डीसीएच, डीसीएचसी सेंटरही फुल्ल झाले आहेत.शहरातील अनेक नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक १८ ते ५० वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.

मेल्ट्रॉन, एमआयटी, एमजीएम, किलेअर्क सिपेट, देवगिरी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पदमपुरा या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी बेड शिल्लक राहत नाही. त्यासोबतच शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालय, डीसीएच, डीसीएचसीमध्येही कोरोना रुग्ण दाखल झालेले आहेत. कोरोना रुग्णमुक्त होण्याच्या संख्येपेक्षा दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे.

महापालिकेने शनिवारी दिलेल्या अहवालात शहरातील कोविड केअर सेंटर, शासकीय रुग्णालय, डीसीएच, डीसीएचसीसह खासगी रुग्णालय मिळून ४६ रुग्णालयांत चार हजार ७३७ कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल असून, त्यात २४५ रुग्णांची भर पडली आहे. रविवारीदेखील दोनशे रुग्ण दिवसभरात दाखल झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजारांवर पोचला आहे.

खासगी रुग्णालयेदेखील कोरोना रुग्णांनी भरले आहेत. शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने तातडीने व्यवस्था करण्याची तयारी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयातील बेड उपलब्ध करून दिले जाणार असून, ऑक्सिजनच्या बेडची व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT