covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

‘घ्या करुन लसीकरण लावा कोरोनाला पळवून’

वैजापुरातील कलाकाराच्या गीताची शासनानेही घेतली दखल, लसीकरणावरील गीतामध्ये घरबसल्या ५० कलाकारांची कला

मनोज साखरे

औरंगाबाद: ते कोविड बाधित होते. पण खचले नाहीत. मनात भिती होती पण स्वतःच्या अंगभूत कलेला न्याय या लोककलावंताने दिला. पन्नास जणांनी एकत्र येत लोकप्रबोधानाचे गीत घरबसल्या तयार केले. त्यासाठी ना गर्दी केली, ना कोविड नियमांचे उल्लंघन! या गीताचा सध्या सोशल मिडीयावर बोलबाला असून शासनानेही या गीताची दखल घेतली. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील या पन्नास कलावंत, लोककलावंतांनी आपापल्या गावात, शहरातच राहून या गीताचे शुटींग, मुख्य गायक, कोरस यांचे ध्वनीमुद्रण मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग केले.

लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठातील व मूळ चिकटगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील उत्कृष्ठ शिवगीत गायक, सुप्रसिद्ध लोककलावंत, योगेश चिकटगावकर यांनी ‘‘घ्या करुन लसीकरण लावा कोरोनाला पळवून’’ हे जनजागृतीपर गीत तयार केले. लोककला जोपासण्याचे जतन, संवर्धन, सादरीकरणाचे मोठे काम ते करीत आहेत.

चिकटगावकर यांनी या गीताची संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, गायन केले आहे. चिकटगावकर म्हणाले ‘‘मुळातच मी प्रबोधनकारी कलावंत आहे. त्यामुळे माझे प्रबोधनकारी रक्त मला स्वस्थ बसू देत नाही म्हणून या गाण्याची कल्पना, संकल्पना सुचली. ते आज मूर्त स्वरूपात तुमच्या समोर आले. या गाण्यातून अजूनही एक चांगला संदेश आम्ही कलावंतांना देऊ इच्छितो की जे कलावंत आज लॉकडाऊनच्या काळात नैराश्येच्या गर्तेत अडकले आहेत त्या कलावंतांना हे गीत नवीन काम करण्याची प्रेरणा देणार आहे. घरीच राहून आपण व्यावसायिकरित्या किंवा प्रबोधनकारी पध्दतीने कसे काम करू शकतो ही प्रेरणा त्यांना या गीतातून मिळू शकेल. कुठल्याही कलावंतांनी यात व्यावसायिक हेतू न ठेवता प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकी जपत हे काम केलेले आहे. मी माझ्या स्वतःच्या खिशातील पैसे घालून हे काम केलेले आहे. त्यामुळे आपण या गीताची चांगल्या प्रकारे दखल घ्यावी हीच माझी कळकळीची विनंती आहे. या गीताची संकल्पना, निर्मीती, दिग्दर्शन, गीत लेखन, संगीत दिग्दर्शन, गायन मी स्वतः केलेले आहे.’’

आगळावेगळा प्रयोग

मी कोरोनाबाधित होतो. या काळात मी खचलो नाही. कलेद्वारे मी स्वतःला व अन्य कलाकारांना उभारी देण्याचे काम केले. हे गीत आता सर्वांच्या तोंडी असून केवळ लोकप्रबोधन व्हावे हाच हेतू होता व तो यशस्वी झाला याचे समाधन आहे. या गाण्यातून कोरोना लसीकरणाबाबत प्रभावी जनजागृती केली. हा महाराष्ट्रात आगळा-वेगळा प्रयोग असून कोरोना काळातही प्रवाहात राहण्याचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT