covid 19 vaccination covid 19 vaccination
छत्रपती संभाजीनगर

आता आजारी, अंथरुणावर पडून असलेल्यांना मिळणार घरीच लस

महापालिकेने शहरात आतापर्यंत सहा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. चार लाख २५ हजार ४३१ जणांना पहिला तर एक लाख ७५ हजार ६८५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे

माधव इतबारे

महापालिकेने शहरात आतापर्यंत सहा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. चार लाख २५ हजार ४३१ जणांना पहिला तर एक लाख ७५ हजार ६८५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे

औरंगाबाद: शहारातील दुर्धर आजारी, दिव्यांग तसेच अंथरुणावर पडून असलेल्या व्यक्तींचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण घरोघरी जाऊन केले जाणार आहे. त्यापूर्वी अशा नागरिकांच्या नोंदी करून घेतल्या जाणार आहेत. करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार लसीकरणासाठी लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. नागरिकांनी अशा १८ वर्षावरिल व्यक्तिंची जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर नोंद करावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

महापालिकेने शहरात आतापर्यंत सहा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. चार लाख २५ हजार ४३१ जणांना पहिला तर एक लाख ७५ हजार ६८५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. दरम्यान शहरातील दुर्धर आजारी, अंथरूनावर पडून असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याविषयी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरातील अशा व्यक्तींच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन त्यांची नाव नोंदणी करावी. त्यानंतर महापालिकेचे मोबाईल पथक अशा व्यक्तींच्या घरी जाऊन लसीकरण करेल. या पथकामध्ये डॉक्टर, व्हॅक्सिनेटर, कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणारा ऑपरेटर यांचा समावेश असेल.

खासगी डॉक्टरला घ्यावी लागणार जबाबदारी
लसीकरण केल्यानंतर अर्धा तास संबधिताला देखरेखीखाली ठेवले जाते. महापालिकेच्या पथकाला प्रत्येकाच्या घरी अर्धातास थांबणे शक्य नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतर संबधित व्यक्तिवर लक्ष ठेवण्यासाठी फॅमिला डॉक्टरला अर्धातास थांबावे लागणार आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे पुण्याच्या नदीपात्रात ठाण मांडून बसले

Latest Marathi News Live Update: सहकार कायद्यात काळानुरूप होणार ' बदल ' राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती जाहीर

T20 World Cup: टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघांची घोषणा; नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संपूर्ण टीम

Pune Election 2026 : कात्रजमध्ये निवडणुकीचा मोठा 'धडाका'! नाकाबंदीत तब्बल ६७ लाखांची रोकड जप्त

Pune Robbery : रुग्णाच्या नावाखाली सापळा; सहकारनगर हद्दीत डॉक्टरला लुटणारे सीसीटीव्हीत कैद!

SCROLL FOR NEXT