covid 19 google
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत अवघ्या दहा दिवसात २२० बालके बाधित!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वीच वाढली प्रशासनाची चिंता

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी सुरू असताना दुसरी लाट ओसरतानाच शून्य ते १८ वयोगटातील करोनाबाधित मुलांची संख्या वाढत आहे. गेल्या दहा दिवसात २२० बालके बाधित आढळून आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने नागरिक बाधित झाले. पण समाधानाची बाब म्हणजे दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २०० पेक्षा खाली आली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला असला तरी रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर येत आहे. गेल्या दहा दिवसात शून्य ते पाच वयोगटातील ४८ तर ५ ते १८ वयोगटातील १७१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. बालकांमध्ये कोरोना संसर्गाचा झपाट्याने वाढत असला तरी लक्षणे सौम्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

१६५४ ॲक्टीव्ह रुग्ण
महापालिकेच्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार ६५४ एवढी आहे. अनेक कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना संसर्ग कमी होत असताना दुसरीकडे मात्र मुलांना संसर्ग होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

तारीख- शून्य ते पाच- पाच ते अठरा (वयोगट)

१० मे- ०८- २३
११ मे - १०- २६
१२ मे- ०४- २३
१३ मे- ०४- १५
१४ मे- ०६- २०
१५ मे- ०२- ०४
१६ मे- ०४- १६
१७ मे- ०५- १३
१८ मे- ०२- १६
१९ मे- ०३- १५
-----------------------------
एकूण- ४८- १७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोलवर कोटा लागणार? भारतात इंधन रेशनिंगची चर्चा; तुमच्या गाडीला किती लिटर इंधन मिळणार? आठवड्याला फक्त…?

IPL 2026 : श्रेयस अय्यर - अर्शदीप सिंग यांच्यात कडाक्याचे भांडण? प्रीती झिंटाला करावा लागला खुलासा

Workplace Love: ऑफिसमध्येच प्रेमाच्या गाठी जुळतात! पण किती टक्के लोक वर्कप्लेसमधील पार्टनरसोबत लग्न करतात? रंजक आकडेवारी समोर

कोणताही शेतकरी स्वखुशीने माल टाकून देत नाही... प्रवीण तरडेंनी सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाले, 'लोक म्हणतात शेतकरी माजलाय...

आधी आणि आता: भारतातील खाजगी मालमत्ता व्‍यवस्‍थापन कसे बदलले

SCROLL FOR NEXT