corona vaccination corona vaccination
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत लसटंचाई राहणार ३० जूनपर्यंत!

शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यासाठी महापालिकेने ११५ वॉर्डात प्रत्येकी एक, दोन सरकारी व २६ खासगी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था केली होती

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्ग (corona infection) रोखण्यासाठी महापालिकेने जास्तीत जास्त लसीकरण covid 19 vaccination) करण्याची तयारी केली आहे. दररोज १५ हजार लसीकरण होऊ शकेल, अशी क्षमता आहे. पण शासनाकडून एक दिवस पुरतील एवढ्याच लसी मिळत आहेत. ३० जूनपर्यंत लसींचा तुटवडा जाणवेल, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (ता. १०) सांगितले.

शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यासाठी महापालिकेने ११५ वॉर्डात प्रत्येकी एक, दोन सरकारी व २६ खासगी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था केली होती. पाच एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. एका दिवसात विक्रमी म्हणजेच दहा हजारापेक्षा जास्त लसीकरण महापालिकेने केले. पण गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत आहे.

महापालिकेची एका आठवड्यासाठी किमान एक लाख लसी मिळाव्यात अशी मागणी आहे. मात्र शासनाकडून कधी पाच, कधी दहा हजार अशा लसी दिल्या जात आहेत. लसीकरणासंदर्भात श्री. पांडेय म्हणाले, महापालिकेने रोज १५ हजार लसीकरण करण्याची तयारी करून ठेवली आहे. पण लसींचा तुटवडा असल्याने सध्या ठरावीक केंद्रावरच लसीकरण केले जात आहे. ३० जूनपर्यंत लसींचा तुटवडा राहील, असा अंदाज श्री. पांडेय यांनी व्यक्त केला.

अडीच लाखांचा टप्पा पूर्ण
लसीकरणाचा महापालिकेने अडीच लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुमारे चार महिन्यात दोन लाख ५६ हजार १५४ जणांना लस दिल्याचे महापालिकेने रविवारी (ता. नऊ) दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

आत्तापर्यंतचे लसीकरण
-आरोग्य विभाग
पहिला डोस-२६,९९३
दुसरा डोस-१२,९७६

-फ्रंट लाईन वर्कर्स
पहिला डोस-३३,७०२
दुसरा डोस-११,२६२

-१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस-४,५०९

४५ ते ४९ (आजारी व्यक्ती)
पहिला डोस-७४,५२३
दुसरा डोस-१५,०८५

-६० वर्षावरील व्यक्ती
पहिला डोस-५६,९०१
दुसरा डोस-२०,२०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT