Life imprisonment esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : वाळूचा हफ्ता देण्यास नकार दिल्याने केला होता खून ; आता तिघांना जन्मठेप

प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वर्चस्व वाद आणि वाळूचा हप्ता देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. पारगावकर यांनी ठोठावली.

हुसेन खान उर्फ बाली इब्राहीम खान (वय ३८), उस्मान खान इस्माईल खान (वय ३०), इम्रान खान हुसेन खान (वय १८, सर्व रा. संजयनगर, दादा कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणात मृत फेरोज खान अनिस खान पठाण (वय ३२, रा. दादा कॉलनी) याचा भाऊ अफसर खान अनिस खान पठाण (वय २७) याने तक्रार दिली. तक्रारीनुसार, मयताचा वाळूचा व्यवसाय होता. फेरोज सोबत त्याच परिसरात राहणारे आरोपी हुसेन खान त्याचा मुलगा इम्रान खान व पुतण्या उस्मान खान यांचा काही दिवसांपासून वर्चस्वाचा वाद सुरू होता.

फेरोज खान वाळुचे हप्ते देत नसल्याचा राग आरोपींना तर आरोपींनी पत्त्याच्या अड्ड्याची माहिती पोलिसांना दिल्याचा संशय फेरोजला होता. याच कारणावरून १९ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी हुसेन उर्फ बालीने फेरोज खानला घरातून बोलावून घेतले. यानंतर संजयनगरातील नाल्याजवळ असलेल्या मनपाच्या सभागृहासमोर त्याला मारहाण करत इम्रान आणि उस्मान या दोघांनी फेरोजला पकडले तर हुसेन उर्फ बालीने त्याच्या गुप्तांगाजवळ चाकुने दोन वार केले.

फेरोजची आरडाओरड ऐकून त्याचा भाऊ अफसर खान व काही तरुणांनी धाव घेतली. तेव्हा आरोपींनी तेथून पळ काढला. फेरोजला उपचारासाठी घाटीत नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन सहायक निरीक्षक एस. बी. जोगदंड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता धनंजय अ. वाकणकर यांनी १८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्‍यायालयाने वरिल तिघा आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. खटलयात वाकणकर यांना अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता बाळासाहेब लोमटे आणि सुर्यकांती सोनटक्के यांनी सहाय्य केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार चंपालाल डेडवाल यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT