crime news crime news
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत ऑनलाइन तलवारी मागविणाऱ्याकडून शस्त्रसाठा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दानिशचा काही दिवसांपूर्वी एका तरुणीशी प्रेम विवाह झाला होता

सुषेन जाधव

औरंगाबाद: खेळणी मागविण्याच्या नावाखाली कुरियरद्वारे ऑनलाइन पद्धतीने पाच तलवारी मागविल्याच्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीकडे तब्बल कुकरी, गुप्ती अशा तब्बल ४९ शस्त्रांचा साठा सापडल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी रविवारी (ता.चार) पत्रकार परिषदेत दिली. सदर साठा पोलिसांनी जप्त केला असून, ही कारवाई जिन्सी व पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे. इरफान ऊर्फ दानिश खान अय्युब खान (रा. हमजा मशीद, जुना बायजीपुरा) असे त्याचे नाव असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता दानिशला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दानिशचा काही दिवसांपूर्वी एका तरुणीशी प्रेम विवाह झाला होता. हा प्रेमविवाह घरच्यांना मान्य नसल्याने त्याला घरातून बाहेर काढले होते. यामुळे दानिश हा पत्नीसह भाड्याने खोली घेऊन बाहेर राहू लागला. यावेळी त्याला पैशाची गरज भासू लागल्याने त्याने वाढदिवस व इतरवेळी तलवार भाड्याने देण्यास सुरवात केली. काही दिवसांनी त्याने तलवार विकायला देखील सुरवात केली होती. यामध्ये दानिशला पैसा दिसू लागल्याने त्याने परराज्यातून ऑनलाइन पद्धतीने तब्बल ४९ घातक शस्त्र मागवली होती.

ही शस्त्रे विक्रीसाठी असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून घातक शास्त्रीय वाहतूक करणाऱ्या गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीमध्ये शस्त्रे आढळून आली. तसेच पोलिसांनी त्याच्या देखील घरामध्ये असलेले घातक शास्त्र जप्त केले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर, शेख सरवर, विशेष शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, सफी अय्युब पठाण, संपत राठोड, हारुण शेख, भाऊसाहेब जगताप, गणी शेख, बाळू थोरात, सुनील जाधव, संजय गावंडे आदींनी केली.

तलवारी बनविणाऱ्या कंपनीची चौकशी-

कोरोनाच्या अनुषंगाने शहरात कडेकोट बंदोबस्त आहे. शहराच्या इंट्री पॉइंटवर कसून तपासणी होत आहे. तरीही या ना त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येतात, याबद्दल पोलिसांना माहिती होत नाही. ज्या कंपनीकडून या तलवारी बनविल्या गेल्या त्यासंदर्भातील कारवाईबद्दल विचारले असता, कंपनीचीही चौकशी केली जाईल असेही गिऱ्हे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT