Crime
Crime esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : पत्नीला भेटण्यासाठी पठ्ठ्याने चोरला ट्रॅक्टर अन् गाठले जालना!

सुषेन जाधव

छत्रपती संभाजीनगर - ‘तो’ ३३ वर्षे वयाचा भामटा. कामधंदा जिवावर येतो म्हणून चोरी करणे, लुटणे यासारखे प्रकार करतो. दोन दिवसांपूर्वीच झाल्टा परिसरात मोबाईल चोरताना नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला होता. त्याच्या या प्रकाराला वैतागून पत्नी जालना येथे माहेरी गेली. आता तो चोर असला म्हणून काय झाले? शेवटी पत्नीची आठवण येणारच! तिला भेटायला जायची त्याची तीव्र इच्छा झाली.

मात्र, खिशात पाहिले तर खडकूही नाही. यावर त्याने ‘चोरटा दिमाग’ वापरला! पठ्ठ्याने चक्क विमानतळाच्या भिंतीलगत पार्किंग करुन ठेवलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेतला आणि थेट जालना गाठले. इकडे तीन लाखांचा ट्रॅक्टर, ट्रॉली चोरी गेल्याचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करत सीसीटीव्हीच्या मदतीने फुटेज काढले. त्यात तो सापडला आणि पोलिसांनी जालना गाठत त्याला अटक केली. राजेंद्र सखाराम बारबिंडे (३३, रा. बजरंगनगर, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडीतील रहिवासी रामनाथ तुकाराम राठोड (५६) हे फिर्यादी आहेत. त्यांनी विमानतळाच्या भिंतीजवळील इच्छामणी हॉटेलसमोर त्यांचा (एमएच २८ डी ०५२९) हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह (एमएच २० सीवाय ०९२७) लावून ठेवला होता.

तो ट्रॉलीसह चोरट्याने सात ते आट ऑक्टोबररोजी रात्री चोरी गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

आरोपी राजेंद्र हा बजरंगनगरात राहतो. तो चोऱ्या, मारामारी करणे, मोबाईल फोन लुटणे, हिसकावणे यासारखे गुन्हे करतो, त्यामुळे त्याची पत्नी त्याला कंटाळून जालना येथे माहेरी गेली होती. दोन दिवसांपूर्वीच त्याला झाल्टा परिसरात मोबाईल चोरी करताना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला होता. त्याला पत्नीला भेटण्यासाठी जालन्याला जायचे होते.

मात्र, खिशात पैसे नव्हते. अखेर ‘तो’ ट्रॅक्टर राजेंद्रच्या नजरेला पडला आणि त्याने चक्क पत्नीला भेटण्यासाठी ट्रॉलीसह ट्रॅक्टर चोरुन थेट जालन्याला पत्नीला भेटण्यासाठी गेला.

अशी केली कारवाई

पोलिसांनी तपास सुरु करताच त्यांच्या हाती चोरीचे सीसीटीव्ही फुटेज लागले. त्यामध्ये राजेंद्र बारबिंडे असल्याचे पोलिसांनी हेरले. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्रच्या भावाला गाठले, त्याच्याकडून राजेंद्रचा मोबाईल क्रमांक घेतला, त्याचे लोकेशन तपासले असता, जालन्याचे निघाले. सायबरच्या मदतीने मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे एक पथक थेट जालन्याला गेले अन् त्याला पकडले.

विशेष म्हणजे, आरोपी राजेंद्रने ट्रॅक्टर ट्रॉली चोरुन जालना गाठले खरे, मात्र आपली चोरी उघड होऊ नये म्हणून त्याने युक्ती लढविली. माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या कार्यालयासमोर ट्रॉली लावून ठेवली तर ट्रॅक्टरचे हेड जालना रेल्वे स्थानक परिसरात लावून ठेवले. पोलिस ट्रॅक्टर, ट्रॉली जप्त करुन आरोपीला घेऊन शहरात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक समाधान वाठोरे, उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, सहायक फौजदार नरसिंग पवार, हवालदार बाबासाहेब कांबळे, नाईक सुखदेव जाधव, पोलिस अंमलदार अनिल थोरे, गणेश वाघ, समाधान काळे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT