Rajesh Tope sakal
छत्रपती संभाजीनगर

उपजिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन बसविण्यात येणार : मंत्री राजेश टोपे

सकाळ वृत्तसेवा

कसबेतडवळे : महिनाभरात राज्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या बाबतचे टेंडरही काढण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा एस. पी. शुगरचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी रोज ३०० टन गाळप क्षमता असलेला सोयाबीन सॉल्व्हंट प्लांट कसबेतडवळे येथे उभारला आहे. त्याचे उद्‍घाटन रविवारी (ता. ३०) आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे होते. आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते विक्रम पडवळ आदी उपस्थित होते.

श्री. टोपे म्हणाले, ‘‘राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणीच सीटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा भार हा एकाच सीटी स्कॅन यंत्रणेवर पडतो. परिणामी, रुग्णांना वेळेत सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. याची परिचित कोरोना काळात आली. यासाठी तालुकास्तरावरील सर्व उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन यंत्रणा महिनाभरात बसविली जाईल. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने सहा हजार कोटी रुपये कर्जाची तरतूद केली.

राज्यातील सर्व ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सोयीसुविधांची उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत’’, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार काळे, राज्यमंत्री बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. दीपक मुळूक यांनी सूत्रसंचालन केले.

सुरेश पाटील यांनी एस. पी. सोयाबीन सॉल्व्हंट प्लांटची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ऑक्टोबर २०२३ पर्यंत बीड जिल्ह्यामधील घाटसाळवी येथे ३,५०० टन क्षमतेचा साखर कारखाना, ९० केलपीडी इथेनॉल प्रकल्प व १४ एमडब्ल्यू सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात कामाला सुरवात होईल’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

SCROLL FOR NEXT