aurangabad
aurangabad aurangabad
छत्रपती संभाजीनगर

गॅसदाहिनीच्या ट्रायलसाठी कुणाचा मृतदेह मिळेल का?

मनोज साखरे

औरंगाबाद: महापालिकेने औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या माध्यमातून कैलासनगर येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू केली आहे. या गॅसदाहिनीचे ट्रायल घेण्यासाठी आता मृतदेहाची शोधाशोध सुरू आहे. त्यासाठी घाटी रुग्णालयाला पत्र देण्यात आले असून, एखादा बेवारस मृतदेह आल्यास गॅस दाहिनीच्या ट्रायलसाठी मिळावा, अशी विनंती महापालिकेने केली आहे. कोरोना संसर्गामुळे शहरात गेल्या वर्षभरापासून मृत्यदर वाढला आहे. संसर्गामुळे शहरातील अनेक नागरिकांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याचबरोबर शहरात जिल्ह्यासह मराठवाड्यातून अनेक जण उपचारासाठी आले. यातील अनेकांना जीव गमवावे लागले. त्यांच्यावर देखील शहरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणून शहरातील स्मशानभूमीमध्ये वेटींग असल्याचे विदारक चित्र काही काळ होते.

यावेळी अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांचा देखील तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे गॅसदाहिनी सुरू करण्याची मागणी समोर आली. दरम्यान औरंगाबाद फर्स्ट या संघटनेने कैलासनगर येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या आठवड्यात हे काम पूर्ण झाले आहे. मात्र दाहिनीचे ट्रायल घ्यावे लागणार आहे. त्याशिवाय ती अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले, की ट्रायल घेण्यासाठी घाटीकडे मृतदेहाची मागणी करणारे पत्र पाठविण्यात आले आहे. शक्यतो बेवारस मृतदेह मिळाला तर बरे, अशी विनंती करण्यात आली आहे. पण अद्याप घाटी रुग्णालयाकडून मृतदेह मिळाली नसल्याने ट्रायल लांबणीवर पडत आहे.

अंत्यसंस्काराचा खर्च होणार कमी-
गॅस दाहिनीच्या वापरामुळे अंत्यसंस्काराचा खर्च कमी होणार आहे. महापालिकेतर्फे शहरातील सर्वसामान्यांच्या घरात मृत्यू झाल्यास मोफत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी स्मशानजोगीला लाकडे, गोवऱ्यांचा खर्च म्हणून अडीच हजार रुपये दिले जातात. पण गॅस दाहिनीचा वापर केल्यास एका अंत्यसंस्कारासाठी एक गॅस व्यावसायिक वापरासाठी बाजारात उपलब्ध असलेले सिलिंडर लागणार आहे. त्याची किंमत सुमारे १७०० रुपये एवढी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT