छत्रपती संभाजीनगर

डायल ११२ वर खोटी माहिती देणे भोवले

CD
डायल ११२ वर खोटी माहिती देणे भोवले, एकावर गुन्हा --- लातूर, ता. १८ ः आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ सेवेचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीवर भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १५) विकास सदाशिव कांबळे यांनी डायल ११२ क्रमांकावर फोन करून खोटी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाने तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. मात्र, पडताळणी केली असता सदर माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे खऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोचण्यास उशीर होण्याची शक्यता असते. तसेच शासकीय यंत्रणेचा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो. या प्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २१७ नुसार शासकीय अधिकाऱ्याला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे हा दंडनीय अपराध आहे. डायल ११२ ही सेवा केवळ आपत्कालीन परिस्थिती-जसे अपघात, मारहाण, आग, महिलांवरील अत्याचार, नैसर्गिक आपत्ती यासाठीच आहे. या क्रमांकावर खोटी माहिती देऊ नये, मस्करी करू नये किंवा गैरवापर करू नये. खोटी माहिती दिल्यास कलम २१७ नुसार कायदेशीर कारवाई होईल, ज्यात दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT