Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

डिजिटल युगातही ‘चोपडी’चे महत्त्व अबाधित

व्यापारी, उद्योजकांच्या नव्या आर्थिक वर्षाचा प्रारंभ

सुहास सदाव्रते

जालना : दीपावली सणातील लक्ष्मीपूजनाला सामान्य व्यक्तीपासून ते उद्योग, व्यापार क्षेत्रातील व्यक्ती लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व देतात.धन,संपत्ती,सुबत्ता वृद्धिंगत होवो,यासाठी घरोघरी पूजन केले जाते. छोटे- मोठे उद्योग असो,की व्यापार यात दररोजचा आर्थिक हिशोब ठेवण्यासाठी संगणक,डिजिटल युगात ‘चोपडी’च वापरली जाते,हे विशेष.

दीपावली हा जसा प्रकाश उत्सवाचा सण आहे, तसा तो आर्थिक उलाढाल आणि नव्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद मांडणारा सण आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाने नवे हिशोबाचे आर्थिक वर्ष मानले जाते. जालना हे उद्योग, व्यापारात अग्रेसर असणारे शहर आहे. बियाणे उद्योग, तेल उद्योग, रेशीम उद्योग, स्टील कंपन्यासह मोठमोठाले उद्योग समूहातून अर्थकारण गती दिसून येते. शहरातील नवीन मोंढा, जुना मोंढा, औद्योगिक वसाहत यासह छोटे मोठे उद्योग चालतात. शहरातील रोंलिग मिल व्यापारात पुढेच आहे.

दीपावली सणानिमित्त बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सध्या दिवाळीचा सण असल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. शहरातील नवीन मोंढा, जुना मोंढ्यासह औद्योगिक वसाहतीत सोमवारी लक्ष्मीपूजनाची मोठी लगबग दिसून आली. नवीन मोंढ्यातील व्यापारी वर्गात लक्ष्मीपूजन, चोपडीपूजनाचे महत्त्व अधिक मानले जाते. दररोजचा व्यवहार, जमा खर्च,आलेला पैसा,उधारी,वसुली यासह ताळेबंद ठेवण्यासाठी व्यापारी ‘चोपडी’ लिहितात. अनेक वर्षांपासून परंपरा असलेल्या लाल रंगाचे कपडा किंवा कागदाचे आच्छादन असलेली चोपडी ही व्यापाऱ्यांकडून सांभाळली जाते.

आर्थिक व्यवहार व हिशोब ठेवण्यासाठी आजही संगणक आणि डिजिटल युगात मात्र चोपडीचे महत्त्व अबाधित असल्याचे चित्र शहरात विविध उद्योग, व्यापारी वर्गात दिसून येते.दिवाळी सणात सोमवारी नवीन व जुन्या मोंढ्यासह औद्योगिक वसाहतीत दुपारी चार नंतर चोपडीचे पूजन करण्यात आले.

दिवाळी सण म्हणजे आनंद असतो. आम्ही वर्षभर ज्याच्या भरवशावर जमाखर्च ताळमेळ मांडत असतो,अशा चोपडीचे पूजन करण्यात आले. तंत्रज्ञान वा डिजिटल जमाना असला तरी चोपडीचे महत्त्व कमी झालेले नाही.

- संतोषकुमार राठी, किराणा व्यापारी,जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT