Aurangabad Crime News
Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

कोविड सेंटरमध्ये महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणारा डॉक्टर बडतर्फ, महापालिकेची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : कोविड सेंटरमध्ये रुग्ण महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला बडतर्फ केले आहे. याबाबत गुरुवारी (ता.चार) महापालिका आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या, की केलेल्या चौकशीत संबंधित डॉक्टर दोषी आढळला आहे. कोणत्याही प्रकारचा फिजिकल अॅसाॅल्ट झालेला नाही. महिलेला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.  


घटनेबाबत माहिती अशी की, महापालिकेच्या पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली होती. या सेंटरमध्ये गेल्या मंगळवारी रात्री कामावर असलेल्या एका डॉक्टरने तिच्यासोबत लगट करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करीत आरडाओरड केली. त्यानंतर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. दरम्यान, सकाळी या प्रकाराची प्रशासनाने गंभीरपणे दखल या प्रकरणी प्रशासनाला चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले होते.  

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT