छत्रपती संभाजीनगर

दवबिंदूंनी फुलली शेतशिवाराची शोभा

CD
ABD26J83194 जवळा पांचाळ ः कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही फुलवलेल्या तुरीची शेतात हिरव्या टवटवीत पानांवर पडलेल्या दवबिंदूंवर उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे पडून शिवार असे सोनेरी रंगाने उजळले आहे. (छायाचित्र ः अविनाश उदगिरे) --- दवबिंदूंनी फुलली शेतशिवाराची शोभा --- जवळा पांचाळ, ता. १५ (बातमीदार) ः कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी न डगमगता रब्बी हंगामातील पिकांसाठी मेहनत घेत आहेत. परिसरात काही दिवसांपासून गारवागी वाढला आहे. त्यामुळे सकाळी सकाळी पडणाऱ्या दवबिंदूंमुळे शेतशिवारांत निसर्गाचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे. शेतात पिकांवर दवबिंदू जमा होत असल्याने सूर्याची कोवळी किरणे दवबिंदूंवर पडताच शेतांमधून सोनेरी चमक उजळत असून, संपूर्ण शेतशिवाराला निसर्गसौंदर्याची अनोखी झळाळी प्राप्त होत आहे. यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर रब्बी पिकांची लागवड केली आहे. अशात काही दिवसांपासून वाढलेली थंडी काही पिकांसाठी पोषक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Photography: डॉक्टरची निसर्गाशी अनोखी मैत्री! ऋषी गाडगे यांच्या छायाचित्रांतून उलगडले पक्ष्यांचे विश्व

दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षकाने उचललं मोठं पाऊल; 'सिनेमॅन'ची हटके कथा पोहोचली थेट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

Rajuri leopard cub : राजुरीत ऊसतोड सुरू असताना बिबट्याचा आठ दिवसांचा बछडा आढळला; शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीती

Latest Marathi News Live Update : विहिरीच्या मोजणीसाठी उतरले अन् काळाने घात केला; मातीचा ढिगारा कोसळून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, आंबे गावावर शोककळा

Raigad migratory birds : रायगड जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू; थंडी वाढताच देशी-विदेशी पक्ष्यांची रेलचेल

SCROLL FOR NEXT