रब्बीच्या पेरणीस दुष्काळाचा फटका
--------------
-जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ २४ टक्के पेरणी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १३ ः पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सिंचनाचे जलस्रोतही आटले आहेत. परिणामी, जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला मोठा फटका बसला आहे. पाच नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी २ लाख ३८ हजार ३८९ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ५६ हजार ८८८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या अवघ्या २४ टक्के पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र हे सर्वाधिक सरासरी एक लाख २० हजार ७४१ हेक्टर असून, त्यापैकी ३० हजार १०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीचे ८५ हजार ९७८ हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात २३ हजार १२० हेक्टरवर पेरणी झाली. या दोन्ही पिकांची पेरणी अपेक्षित वेगाने झालेली नाही. गव्हाची स्थितीही चिंताजनक असून, ३० हजार १९७ हेक्टरच्या तुलनेत केवळ २ हजार ५६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुसरीकडे, कमी पाण्यात तग धरणाऱ्या करडई पिकाने मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात सरासरी १ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रापैकी ८७० हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण ६१ टक्के आहे. जिंतूर तालुक्यात करडईचा पेरा सरासरीच्या तिपटीहून अधिक झाला आहे. परभणी, जिंतूर आणि पूर्णा तालुक्यांत पेरणीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. मात्र, जायकवाडीचे पाणी जिल्ह्यात पोचण्यास विलंब होत असल्याने सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी पेरणीची आशाही सोडली आहे.
..............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.