education iti admission recognition of twenty six units of ITI in marathwada
education iti admission recognition of twenty six units of ITI in marathwada sakal
छत्रपती संभाजीनगर

ITI Admission : मराठवाड्यात आयटीआयच्या सव्वीस तुकड्यांना मान्यता; दुसऱ्या फेरीपासून दिले जाणार प्रवेश

संदीप लांडगे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील विविध आयटीआयमध्ये यंदा २६ तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या तब्बल दीड हजार जागा वाढल्या आहेत. दुसऱ्या फेरीपासून या रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

यावर्षी मराठवाड्यातील एकूण ८२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ६२ अशासकीय आयटीआयमध्ये अनुक्रमे १५ हजार दोनशे व ६ हजार ९२० अशा एकूण २२ हजार १२० जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ७७ असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक,

वायरमन, कोपा, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटर व्हेईकल आहे. डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, वेल्डर लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर अशा ट्रेडचा समावेश आहे.

या नवीन वाढीव तुकड्यांमुळे मराठवाड्यातील आयटीआय संस्थांमध्ये तब्बल दीड हजार जागांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून आयटीआयमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत.

त्यानुषंगाने ज्या ट्रेडला प्रतिसाद मिळत नव्हता असे मेसन, फाउंन्ड्रीमन, टेक्नो मराठी हे ट्रेड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्याजागी मुलांची पसंती असलेल्या ट्रेडच्या तुकड्या वाढवण्यात आल्या असल्याचे माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रा. अभिजित अल्टे यांनी सांगितले.

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण (एटीकेटी) अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाइन करता येत आहेत.

शहर नव्या तुकड्या

  • निलंगा ः ५

  • तुळजापूर ः ४

  • चाकूर ः ४

  • नांदेड ः ४

  • फुलंब्री ः ३

  • जाफराबाद ः २

  • गंगापूर ः २

  • हिंगोली ः २

  • अहमदपूर ः ३

एकूण - २६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT