ITI Admission : दहावीत १०० टक्के गुण मिळाले पण या ५० जणांची पसंती चक्क आयटीआयला!

राज्यातील सरकारी, खाजगी आयटीआयमधील प्रवेशाची तात्पुरती प्राथमिक गुणवत्ता यादी आज जाहीर झाली.
ITI
ITIsakal

मुंबई - राज्यातील सरकारी, खाजगी आयटीआयमधील प्रवेशाची तात्पुरती प्राथमिक गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यामध्ये एकूण २ लाख ६० हजार ५४८ जणांचा समावेश असून त्यामध्ये २ लाख ६० हजार ५४८ मुले आणि ३८ हजार ५०६ मुलींचा समावेश आहे. तर दहावीत १०० टक्के गुण मिळवलेल्या ५० विद्यार्थ्यांनीही आयटीआयच्या विविध ट्रेडसाठी अर्ज केला असून ते या गुणवत्ता यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

१०० टक्के गुण मिळवलेल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये मुंबईसह, पुणे, नगर, अकोला, अमरावती आदी शहरातील मुलांचा समावेश आहे. यात ५० पैकी ४८ मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील हरकती आणि सूचना १४ जुलैपर्यंत करता येतील.

त्यांनतर अंतिम गुणवत्ता यादी ही १६ जुलै रोजी जाहीर सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाणार असून त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरी २० जुलै रोजी जाहीर होईल आणि त्यानंतर या फेरीतील यादीनुसार २१ ते २५ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना आपले प्रवेश घेता येतील.

राज्यात शासकीय ४१८ आणि खाजगी संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणारी ५७४ आयटीआय असून यामध्ये १ लाख ५४ हजार ३९२ जागा उपलब्ध आहेत. यातील यावर्षी एकूण 418 शासकीयमधील 95 हजार 380 तर खाजगी आयटीआयमधील 59 हजार 12 अशा एकूण 1 लाख 54 हजार 392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

अशा आहेत जागा उपलब्ध

उपलब्ध जागांपैकी 53 हजार 600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणा नुसार अनुसूचित जातींसाठी 20 हजार 72, अनुसूचित जमातीसाठी 10हजार 808, इतर मागासवर्ग 29 हजार 335, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 15 हजार 439, विमुक्त जाती 4 हजार 631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3 हजार 859, 5हजार404 व 3 हजार88 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2 हजार 548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7 हजार719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61 हजार 756 जागा उपलब्ध आहेत.

यामुळे प्रवेशाचा कल वाढला

आयटीआयमध्ये व्यावसायिक आणि कौशल्य विकासविषयक तब्बल ८५ ट्रेड उपलब्ध आहेत. त्यातच यंदाच्या शैक्षणिक वर्षांत ड्रायव्हर कम मेकानिक, स्मार्टफोन टेक्निशियन, एरोनॉटिकल स्ट्रक्चरल अँड इक्विपमेंट फिटर, ड्रोन टेक्निशियनसारखे नवीन ट्रेडही आल्याने आयटीआयमधील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल वाढला यामुळे यंदाही १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशाला पसंती दिली असल्याचे आज जाहीर झालेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीतून समोर आले आहे.

तात्पुरत्या यादीतील टक्केवारीनिहाय विद्यार्थी संख्या

एकूण टक्केवारी विद्यार्थ्यांची संख्या

९० टक्के आणि त्यावर - १,२०४

८० ते ९० टक्के - ५,०८९

८० ते ८५ टक्के - १३,९०२

७० ते ८० टक्के - ५८,३५१

६० ते ७० टक्के - ८०,५६२

५० ते ६० टक्के - ६२, ४०१

३५ टक्के - ७७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com