RTE Admission esakal
छत्रपती संभाजीनगर

English Medium School : इंग्रजी शाळांना प्रतिपूर्ती मिळणार कधी? तीन वर्षांपासून अनुदानाची रक्कम थकीत

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळांमधून इंग्रजीतून शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी २५ टक्के कोटा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळांमधून इंग्रजीतून शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी २५ टक्के कोटा आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या इंग्रजी शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम देण्यास शासनाकडून वारंवार विलंब होत आहे.

मागील तीन वर्षांपासून शासनाकडून इंग्रजी शाळांना प्रतिपूर्ती मिळालेली नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५४५ शाळांची सुमारे ५० कोटी रुपये आरटीईची प्रतिपूर्ती थकीत आहे.

राज्य शासनाने विनाअनुदानित खासगी शाळांना आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागेवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे शासनाकडून शाळेला दरवर्षी १७ हजार ६७० रुपये इतके अनुदान दिले जाते.

परंतु, २०१९ पासून ही रक्कम मिळाली नाही. राज्यात आरटीईअंतर्गत सुमारे १० हजारांहून अधिक शाळा आहेत. या शाळांमधील जवळपास साडे चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. मात्र, तीन वर्षांपासून शासनाकडे या शाळांची आरटीईची प्रतिपूर्तीचे पंधराशे कोटीहून अधिक रक्कम थकलेली आहे.

राज्यातील १० हजार शाळांतील साडे चार लाख विद्यार्थ्यांचे सुमारे पंधराशे कोटी रुपये शासनाकडे थकीत आहे. शासनाकडून ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप इंग्रजी शाळा संघटनेने केला आहे.

आरटीईअंतर्गत शाळांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम कशी थकीत राहील, या दृष्टिनेच राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात असावेत. २०१९ पासूनची राज्यातील खासगी शाळांचे सुमारे दीड हजार कोटी इतकी रक्कम थकित आहे. जिल्ह्यातील तीन वर्षांचे सुमारे ५० कोटीहून अधिक रक्कम शासनाकडे थकीत आहे.(Latest Marathi News)

मात्र, ही रक्कम देण्यास शासनाकडून विलंब केला जातो. त्यामुळे आरटीईचे विद्यार्थी नको अन् प्रतिपूर्तीही नको म्हणत, अनेक इंग्रजी शाळांनी अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त करून घेतला आहे. शिक्षण विभाग व शासन देखील याची दखल घेत नाही, हे दुर्दैवी आहे.

- प्रल्हाद शिंदे, संस्थापक अध्यक्ष, मेसा इंग्रजी शाळा संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT