Ex MLA Haribhau Bagde
Ex MLA Haribhau Bagde 
छत्रपती संभाजीनगर

हरिभाऊ बागडेंचा पत्ता कट; भाजपच्या कार्यकर्त्यांत नाराजी

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ बागडे यांचा शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांत नाराजी दिसून आली. ज्येष्ठ कार्यकर्ते असल्याने बागडे यांना भाजप पक्षाने प्राधान्य द्यायला हवे होते, अशी चर्चा मंगळवारी (ता. ९) दिवसभर मतदारसंघात होती.

विधानसभा मतदारसंघ हा फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यात विभागला गेला आहे. यात प्रामुख्याने औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभागाचा समावेश आहे. हरिभाऊ बागडे संघाच्या तालमीत वाढलेले आहे. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारच्या काळात आमदार हरिभाऊ बागडे यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरी दहा वर्ष काँग्रेस पक्षाने चांगले वर्चस्व मिळविल्याने कल्याण काळे यांना आमदारकीची लॉटरी लागली. त्यानंतर पुन्हा २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये आमदार हरिभाऊ बागडे विजयी झाले. शिवसेना-भाजपच्या सरकारच्या काळात त्यांच्यावर विधानसभा अध्यक्ष या सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सतत पाच वर्ष विधानसभा अध्यक्षाचे सर्वोच्च पद त्यांनी चोखरित्या सांभाळले आहे.

त्यानंतर आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्ष किंवा कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची तालुक्यात चर्चा नव्हती. मात्र, ज्येष्ठ असल्याने ते मंत्री होतील, अशी आशा कार्यतर्त्यांना होती. परंतु नऊ ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून भाजपच्या पारड्यातून अतुल सावे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आमदार बागडे यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे दिसून आले. बागडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायला हवा होता, अशी चर्चा दिवसभर फुलंब्री तालुक्यात सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT