शेतकरी रमेश अंबादास पोफळे
शेतकरी रमेश अंबादास पोफळे 
छत्रपती संभाजीनगर

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

संतोष शेळके

दीड एकर कोरडवाहू शेतीच्या उत्पन्नातून घर चालवायचे, मुलीच्या लग्नाची चिंता, काही दिवसांवर आलेली पेरणी व त्यासाठी लागणारी पैशाची तजबीज होत नसल्याने ते काही दिवसांपासून नैराश्यात होते.

करमाड (जि.औरंगाबाद) : हिवरा (ता.औरंगाबाद) Aurangabad येथील रमेश अंबादास पोफळे (वय ४०) या अल्पभुधारक शेतकऱ्याने रविवारी (ता.१३) पहाटे शेतातील झाडाला गळफास Farmer Suicide लाऊन घेत आत्महत्या केली. खासगी वाहनावर ड्रायव्हरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रमेशचे लॉकडाऊनमुळे Lock Down मागील दीड वर्षांपासून काम बंद होते. त्यामुळे घरात पैशांची चणचण जाणवत होती. यातच मोठी मुलगी लग्नाला आलेली. दीड एकर कोरडवाहू शेतीच्या Agriculture उत्पन्नातून घर चालवायचे, मुलीच्या लग्नाची चिंता, काही दिवसांवर आलेली पेरणी व त्यासाठी लागणारी पैशाची तजबीज होत नसल्याने ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. यातुनच रमेशने स्वतः च्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असावी. दूध काढण्यासाठी रमेशचा छोटा भाऊ सुरेश हा शेतात आला असताना त्याच्या ही घटना निदर्शनास आली. त्याने आरडाओरड करून इतर भावंडे व शेजारच्यांना बोलावून घेत रमेशला झाडावरून खाली काढले. Farmer Committed Suicide Due to Financial Crisis In Aurangabad

मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रमेशच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी हिवरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. घटनेबाबत करमाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT