Rape Crime news Sakal
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक ! नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

आईने विरोध करण्याचा प्रयत्न करताच नराधम बापाने मुलीच्या आईच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन गंभीर जखमी केले.

सकाळ डिजिटल टीम, रामराव भराड

औरंगाबाद : बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) उघडकीस आली आहे. या प्रकरणी बापाविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवरगाव येथील एका बापाने सप्टेंबर २०२१ ते जानेवारी या पाच महिन्यांदरम्यान आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकटी असल्याचा फायदा घेऊन बलात्कार केला आहे. याबाबत घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. वेदना असाहाय्य झाल्याने तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी आईने विरोध करण्याचा प्रयत्न करताच नराधम बापाने मुलीच्या आईच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन गंभीर जखमी केले आहे.(Father Abused His Minor Daughter In Aurangabad)

शेवटी मुलीच्या आईने वाळूज (Waluj) पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने नराधम बापाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT