file photo 
छत्रपती संभाजीनगर

खुशखबर; 15 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार कर्जमाफीची पहिली यादी

प्रकाश बनकर

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारतर्फे महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्‍ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारतर्फे सुरू केलेल्या पोर्टलवर अडचणी येत होत्या. ही अडचण आता दूर झाली असून आतापर्यंत राज्यातील 80 टक्‍के शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. येत्या 15 फेब्रुवारीला पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती अग्रणी बॅंकेचे महाव्यवस्थापक एस. जे. करेगावकर यांनी बुधवारी (ता. पाच) दिली. 

कर्जमुक्‍तीचे काम शासनस्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी एक ते 28 रकान्यांतील कर्जदारांची माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हीच माहिती आता सरकारतर्फे बॅंकांना देण्यात आलेल्या पोर्टलवर भरण्याचे कामही सुरू झाले आहे; मात्र राज्यभरात एकाच वेळी या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात येत असल्यामुळे तांत्रिक अडचण आली होती. ही अडचण विशेषकरून सहकारी बॅंकांना आली होती. ही अडचण आता मुंबईतून तत्काळ सोडविण्यात आली आहे. 
हेही वाचा :53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)...  
तेरा राष्ट्रीयीकृत बॅंकांतर्फे अपलोडिंगचे काम सुरू 

आतापर्यंत एक लाख 81 हजार 518 शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्‍ती देण्यात येणार आहे. यासाठी बॅंकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एक ते 28 या रकान्यांत माहिती भरून घेण्यात येत आहे. 13 राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंक यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. 

 हेही वाचा :अन्‌ आमदार प्रशांत बंब म्हणाले, कोण चिखलीकर....   
आक्षेपही मागविणार 

ही माहिती अपलोड झाल्यांनतर शासनाकडून ही माहिती पुन्हा बॅंकांकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार बॅंकांतर्फे आलेली यादी गावातील ग्रामपंचायत; तसेच चावडीच्या ठिकाणी व बॅंकेत लावण्यात येईल. लाभार्थी शेतकरी यादीनुसार आलेली रक्‍कम तपासणी करेल. त्यानंतर शेतकऱ्यांचा आक्षेप असेल तो नोंदविता येईल. ज्यांना आक्षेप नाही, त्यांच्या खात्यात ही रक्‍कम जमा केली जाणार असल्याचेही करेगावकर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT