Mumbai Heavy Rain : पावसााचा फटका! सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; नेरळ-भिवपुरी रेल्वे रुळांवर पाणी, प्रवाशांचे हाल

Central Railway Services Disrupted for Fourth Consecutive Day : नेरळ-भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बदलापूर ते कर्जत या दरम्यानची लोकल सेवा खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
Central Railway Services Disrupted for Fourth Consecutive Day

Central Railway Services Disrupted for Fourth Consecutive Day

esakal

Updated on

मुंबईसह ठाणे आणि कर्जत परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेला बसला आहे. सलग चौथ्या दिवशी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेरळ-भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बदलापूर ते कर्जत या दरम्यानची लोकल सेवा खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती बंद करण्यात आली आहे. परिणामी सकाळी कामासाठी मुंबईकडे निघालेल्या हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com