Forest Guard Transfer Chhatrapati Sambhaji Nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : वनरक्षक बदल्यांसाठी दिलेले पैसे ‘सकाळ’ने दखल घेतल्याने मिळाले परत

जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वनरक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी एक लाख रुपयांची मागणी.

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar - जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वनरक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप झाला होता. याच संदर्भात संघटना आणि ‘सकाळ’ने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. यामुळे या बदल्या झाल्या. एवढेच नव्हे तर बदल्यांसाठी काही वनरक्षकांकडून घेण्यात आलेले पैसे त्यांना परत देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दोन्ही जिल्ह्यांतील ६७ वनरक्षकांच्या बदल्या गेल्या वर्षभरापासून झालेल्या नव्हत्या. यावर्षी त्या होण्यासाठी काहींनी पैसे मागितल्याची माहिती समोर आली होती. काही वनरक्षकांनी हे पैसे दिले होते. त्यानंतरही त्यांच्या बदल्या अडविण्यात आल्या होत्या. या प्रकरणी ‘सकाळ’मध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ३० जूनला या बदल्या झाल्या.

ज्या अधिकाऱ्यांच्या हातात बदलीचे अधिकार होते, ते रजेवर गेले. यामुळे प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांनी हे बदलीचे आदेश काढले होते. दरम्यान बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर ज्या वनरक्षकांनी पैसे दिले होते. त्यांना ते परत देण्यात आले. यामुळे वनरक्षकांची बदली प्रक्रिया ही विनामूल्य झाल्याची भावनाही अनेक वनरक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

‘त्या’ अधिकाऱ्यांवर व्हावी कारवाई

वनरक्षक भरती प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्यात आली. याला कारणीभूत असलेले आणि या प्रक्रियेसाठी वनरक्षकांकडून पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT