Thief Sakal
छत्रपती संभाजीनगर

Thief : माजी महापौरांचा 15 हजारांचा बूट चोरला; पालिकेची अख्खी यंत्रणाच लागली कुत्र्यांच्या मागे

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दारासमोर ठेवलेला १५ हजारांचा बूट मोकाट श्‍वानाने चोरला अन् महापालिकेची यंत्रणा ‘तो’ श्‍वान शोधण्याच्या कामाला लागल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन श्‍वानांना पकडल्यानंतर नेमका बूट कोणत्या श्‍वानाने चोरला हे मात्र गुलदस्त्यातच राहिले!

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे इटखेडा भागात निवासस्थान आहे. शनिवारी रात्री ते घरी आले. नेहमीप्रमाणे आपला बूट दारासमोर काढला व ते झोपी गेले. सकाळी पाहतात तर एक बूट गायब झाला. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर बूट कुत्र्याने नेल्याचे समोर आले. त्यामुळे श्री. घोडेले यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन करून परिसरात मोकाट श्‍वान वाढले असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना करत बूटच श्‍वानाने नेल्याचे सांगितले.

त्यानुसार तातडीने श्‍वान पकडणारी गाडी इटखेडा भागात आली. त्यांनी मोकाट श्‍वानांचा शोध घेत तीन श्‍वानांना पकडले, पण महापौरांचा बूट काही सापडला नाही. या तीनही श्‍वानांना कोंडवाड्यात पाठविण्यात आले. श्‍वानाने नेलेला श्री. घोडेले यांचा बूट १५ हजार रुपये किमतीचा होता आणि तो त्यांनी काही दिवसांपूर्वीच खरेदी केला होता.

यासंदर्भात श्री. घोडेले यांनी सांगितले की, बूट गेला पण, त्यापेक्षा परिसरातील नागरिकांना मोकाट श्‍वानांचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पथकाला बोलविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaijapur Accident: अंत्यविधीसाठी जाताना दांपत्याचा मृत्यू; वैजापूर गंगापूर राज्य रस्ते मार्गावर भीषण अपघात

Pune News : भिडे वाडा स्मारकाचे काम जोरात; नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पूर्ण होण्याची शक्‍यता

Sugarcane protest: आंदोलनाचा भडका कर्नाटकात; दिलासा महाराष्ट्राला, दोन्ही राज्यांच्या हक्काचा ऊस सुरक्षित..

Latest Marathi News Live Update : निवडणुकांमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढं जाण्याची शक्यता

Pune : एक कोटी मला, एक कोटी साहेबांना; PSIने मागितली २ कोटींची लाच, ४६ लाख घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT