jalna ganeshotsav  sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna : जाफराबादचा जागृत श्री गणेश

जाफराबाद सध्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असलेले श्री गणेश मंदिर

गजानन उदावंत

जाफराबाद : शहरातील शेकडो वर्षांपासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जागृत श्री गणेश देवस्थान आहे. ब्राह्मणगल्लीमध्ये असलेल्या जागृत श्री गणेश मंदिराची इमारत कालमानपरत्वे मोडकळीस आलेली होती. त्यामुळे भाविकांनी मंदिराच्या जिर्णोद्धार कार्याला सुरुवात केलेली आहे. येथे संकष्ट चतुर्थी, गणेशोत्सव काळात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी जमते.

जाफराबादमधील भाविकांचे आराध्यदैवत म्हणून जागृत श्री गणेश प्रसिद्ध आहे. मंदिराची मूळ वास्तु पुरातन काळातील आहे. मंदिराचा कळस, श्री ची प्रभावळ, दगडी चौकट, मंदिरामधील कमानीचे नक्षीकाम स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. जाफराबाद येथील मुळे घराण्यातील विठोबा नाना या महापुरुषाच्या हस्ते हे मंदिर बांधलेले असल्याचे भाविक सांगतात. साधारणतः अडीच ते तीन फूट उंचीची श्री मूर्ती आहे. मूर्तीचे शेंदूरलेपन करण्यात आलेले आहे, श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न वाटते असा भाविकांचा अनुभव आहे.

या मंदिरात या मंदिरात माघ महिन्यातील गणेश जयंती व वसंत पंचमीला उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही सुरू आहे.या निमित्ताने शेकडो भाविकांना अन्नदान करण्यात येते. मंदिरात दर संकष्ट चतुर्थीला मंदिरात श्री अथर्वशीर्ष पठण करून महाआरती व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो. या मंदिरात पुजारी राजेश्‍वर मुळे यांचे घराणे मोठ्या श्रद्धेने धार्मिक सेवाकार्य करते. जिर्णोद्धार कार्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या परिसरात भव्य असे जागृत श्री गणेश मंदिर उभारले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT