Gunratna Sadavarte esakal
छत्रपती संभाजीनगर

Mhada|गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना अटक करा : गुणरत्न सदावर्ते

'म्हाडाची प्रश्नपत्रिका फुटली. आरोपींना अटक झाली पुण्याला.'

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : म्हाडाची प्रश्नपत्रिका फुटली. आरोपींना अटक झाली पुण्याला. यातून कायद्याचा बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केला आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथील मध्यवर्ती बसस्थानकात सुरु असलेल्या एसटी आंदोलनातील कर्मचाऱ्यांची आज मंगळवारी (ता.१४) सदावर्ते यांनी भेट घेतली. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारच्या नाकर्तेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांना प्राण गमवावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. (Gunratna Sadavarte Visit St Workers In Aurangabad, Arrest Jitendra Awhad He Demand)

शहरात येण्यापूर्वी पोलिसांनी अडवल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण झालेच पाहिजे अशा घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या. महापुरुषांचा एकेरी उल्लेख करु नये, अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी केली.मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे. त्यांनी माझी भीती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांना जाहीर अभिवादन.

कष्टकऱ्यांनो तुम्ही जात, धर्म यावरुन एकत्र आला नाहीत, असे ते एसटी संपात सहभागी कामगारांना उद्देशून म्हणाले. नांदेडमध्ये लक्ष्मण गायकवाड नावाचे पत्रकार होते. ते स्पष्ट लिहायचे. त्यांच्यापुढे संजय राऊत काहीच नाहीत, असा चिमटा गुणरत्न सदावर्ते यांनी शिवसेनेला काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT