छत्रपती संभाजीनगर

हिवाळ्याच्या तोंडावर धाराशिव जिल्हा ‘तापला’ - कमाल तापमान ३३.२ अंशांवर; जमिनीतील ओल घटू लागली

CD
((एक मेन)) ................................... जमिनीतील ओल घटू लागली - हिवाळ्याच्या तोंडावर जिल्हा ‘तापला’; तापमान ३३.२ अंशांवर - २२५ प्रकल्पांतील ६ टक्के पाणीसाठ्यावर बाष्पीभवनाचे सावट सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ४ ः ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच ऐन हिवाळ्याच्या तोंडावर धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. जिल्ह्यात कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आधीच दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट असताना, आता वाढलेल्या या चटक्यामुळे दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. ...... रब्बीच्या चिंतेने ग्रासले दरवर्षी या काळात गुलाबी थंडीची चाहूल लागून शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात. मात्र, यंदा अचानक वाढलेल्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा अत्यंत वेगाने कमी होऊ लागला आहे. पेरणीसाठी जमिनीत आवश्यक तो पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्याने यंदा रब्बीच्या पेरण्यांवर टांगती तलवार असून कोरडवाहू जमिनीत पेरण्यांची शक्यता धूसर दिसू लागली आहे. आधीच खरिपाच्या नुकसानीतून न सावरलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बीच्या चिंतेने ग्रासले आहे. ........ ((चौकट)) प्रकल्पांत केवळ ६ टक्के पाणी जिल्ह्याची पाण्याची स्थिती आधीच अत्यंत बिकट व चिंताजनक आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण २२५ जलप्रकल्पांमध्ये सध्या केवळ ६ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातच उन्हाचा पारा वेगाने वाढल्यामुळे या अपुऱ्या पाणीसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. ........................... ((चौकट)) दिवसा उकाडा, नागरिक त्रस्त सध्या ऑक्टोबरच्या सुरवातीलाच उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कडक ऊन आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची पायपीट सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT