आयोजित पत्रकार परिषद sakal
छत्रपती संभाजीनगर

हिंगोली शिवसेनेचा बालेकिल्ला होतोय

खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार वाढला असून आता हा जिल्हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला होत आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे मत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी शुक्रवारी ता.२५ केले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानिमित खासदार मंडलीक तीन दिवसापासून हिंगोलीत आहेत. आयोजित पत्रकार परिषदेस खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम, उध्दव गायकवाड, यशोदा कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार मंडलीक म्हणाले, जिल्ह्यात खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांच्या कामाचा प्रभाव आहे. तीन दिवसांपासून जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व इतरही पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत शिवसेना अधिक मतानी निवडून येणार असून शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT