जंगलातील कृत्रिम पाणवठ्यात
जंगलातील कृत्रिम पाणवठ्यात  sakal
छत्रपती संभाजीनगर

हिंगोली : पाणवठ्यामुळे वन्यप्राण्यांची सोय

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात काही दिवसांपासून उन्हाळ्याचा झळा सुरू झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेली आहे. काही भागात वन्यप्राण्यांची पाण्याची पाण्यासाठी भटकंती होत असल्याने वनविभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. येथे वन्यप्राणी तहान भागवत आहेत.

जिल्ह्यात काही दिवसांपासून उन्हाचे चटके बसत आहेत. तापमान ३६ ते ३८ अंशावर गेले आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील खोलवर गेली आहे. नदी नाले कोरडे पडले आहेत. याचा परिणाम जंगलात राहणाऱ्या प्राण्यांवर झाला आहे. या प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हे प्राणी सैरावैरा पाण्यासाठी शेतशिवारात येत आहेत. या प्राण्यांची भटकंती थांबविण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेत जंगलात तयार केलेल्या पाणवठ्यात पाणी सोडल्याने पाणवठे तुडुंब भरले आहेत. यामुळे वन्यप्राण्याची भटकंती थांबण्यास मदत झाली आहे.

वनविभागाने औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी तसेच सेनगाव तालुक्यातील घोरदरी, भंडारी, उटी आदी ठिकाणी असलेल्या जंगलातील कृत्रिम पाणवठ्यात टँकरने पाणी आणून हे पाणवठे पाण्याने भरले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था झाली असल्याने त्यांच्या भटकंतीवर परिणाम झाला आहे. या पाणवठ्यावर हरिण, काळवीट, रानडुकरे, मोर आदी वन्यप्राणी तहान भागवत आहेत.

सेनगाव तालुक्यातील बोडखी, भंडारी, उटी आदी ठिकाणच्या जंगलात वनविभागाने १४ ते १५ कृत्रिम पाणवठे तयार केले असून ते पाण्याने भरले आहेत. यासाठी वनरक्षक श्री. खरात, श्रीमती शेलार, वनपाल श्री. जावळे देखभाल करीत आहेत. पाणवठ्यातील पाणी कमी होताच त्यात परत पाणी सोडण्यात येत असल्याने वन्यप्राण्यांच्या भटकंती थांबण्यास मदत झाली आहे.

नदी नाले कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होणार नाही यासाठी वनविभागाने जंगलात वन्यप्राण्यांसाठी तयार केलेल्या कृत्रीम पाणवठ्यात पाणी सोडले आहे. यामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. सेनगाव तालुक्यातील जंगल भागात १४ ते १५ पाणवठे सध्या पाण्याने भरले आहेत. याची देखभाल वनरक्षक व वनपाल करीत आहेत. तसेच वनविभागाने वनराई बंधारे देखील तयार केले आहेत.

- बी. एच. कोळगे,उपविभागीय वनाधिकारी हिंगोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT