अंबाजोगाईत सराईत दारू
विक्रेत्यावर एमपीडीए
-
बीड, ता. १३ : गणेशोत्सवात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा तीव्र केला आहे. अंबाजोगाई येथील सराईत दारू विक्रेता किशोर जाधव (वय ३९, रा. चनई) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करत त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
किशोर जाधव याच्यावर बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करणे, तिची विक्री व वाहतूक करण्याचे एकूण ६ गंभीर गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ११ सप्टेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन हर्सूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.