छत्रपती संभाजीनगर

पोलिसांची वाळू तस्करांवर कारवाई; महसूल प्रशासनाचे मात्र मौन!

CD
वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले लिंबोडी फाट्यावर पोलिसांकडून वाळू तस्करांवर कारवाई आष्टी, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी (ता.१२) रात्री लिंबोडी फाटा परिसरात पोलिसांनी कारवाई करीत वाळूने भरलेले दोन टिप्पर पकडले. या कारवाईत सात ब्रास वाळू आणि दोन टिप्परसह तब्बल २७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्याची जबाबदारी महसूल विभागाची असताना प्रत्यक्षात पोलिसांनाच कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांवरून वाळूने भरलेली वाहने धावत असताना तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या पथकाला त्याची माहिती मिळत नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लिंबोडी फाटा येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत (एमएच १२, पीक्यू ९५११) आणि (एमएच १६, वाय ९१९२) क्रमांकाचे दोन टिप्पर पकडण्यात आले. चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच वाहनांची आवश्यक कागदपत्रे नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली, ही बाब स्वागतार्ह असली तरी महसूल विभागाच्या पथकांची निष्क्रियता अशा प्रकारांना खतपाणी घालत असल्याचे चित्र दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

MPSC गट-क भरती; १६,७१७ पदांसाठी आजपासून भरता येणार अर्ज; आधी फॉर्म भरलेल्यांनाही मिळणार नव्या संवर्गांचा पर्याय

Latest Marathi News Live Update: उदापूर येथे सुपर कॅरी गाडीची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT