Corona
Corona esakal
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात दोन हजाराच्या वर नवीन कोरोनाबाधित, ९७ जणांचा मृत्यू

सकाऴ वृत्तसेवा

दिवसभरात जिल्ह्यातील २०५ कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. सध्या एक हजार ७२५ रुग्ण उपचार घेत असून, ६३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना (Corona) रुग्णाच्या संख्येत घट (decline) कायम आहे. शनिवारी (ता. २२) दिवसभरात नव्या २८८६ रुग्णांची भर पडली तर ९७ जणांचा मृत्यू (Died) झाला. (In Marathwada, the number of corona patients continues to decline)

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी ६४० जणांना (मनपा २३०, ग्रामीण ४१०) सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत १,३१,०९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी एकूण ४२९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,४०,०३४ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३०५२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ५८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी २४ मृत्यूची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या तीन हजार २७५ अहवालांपैकी १६९ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात जिल्ह्यातील २०५ कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. सध्या एक हजार ७२५ रुग्ण उपचार घेत असून, ६३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. आत्तापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या १ हजार ८४५ एवढी आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारी २२० व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. ११२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले.

रुग्णालयातील कक्षात दोन हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला तर नवीन ६१ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. सध्या ५२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी २२७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ५७७ रुग्ण तर ११ मृत्यूची नोंद झाली. बीड जिल्ह्यात शनिवारी तब्बल ५५२० लोकांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल हाती आले. यात ७७९ रुग्ण आढळले.

यामध्ये ४७३१ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, १४ मृत्यू नोंद झाली. लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. शनिवारी ही संख्या २९९ पर्यंत खाली आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर कायम आहे. जिल्ह्यात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शनिवारी जिल्ह्यात एक हजार ३१ आरटीपीसीआर तपासणीत १४८ तर दोन हजार १५३ अँटीजेन तपासणीत १५१ असे तीन हजार १८४ तपासणीत २९९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. अहवालानुसार २६ जणांचा मृत्यू झाला असून, शुक्रवारी अकरा जणांचा तर ३ ते २० मे दरम्यान दहा दिवसांत मृत्यू पावलेल्या १५ रुग्णांचा समावेश आहे. (In Marathwada, the number of corona patients continues to decline)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT