Shrirang Barne
Shrirang Barne Sakal media
छत्रपती संभाजीनगर

जालना: नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर

उमेश वाघमारे

जालना: नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी करायची की नाही ? याचा निर्णय स्थानिक नेत्यांवर आहे, असे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरूवारी (ता.२४) आयोजित पत्रकारा परिषदेत म्हटले आहे. शिवाय लोकसेभला अजून अवधी आहे, त्यामुळे मावळसह जालना लोकसभा मतदार संघासंदर्भात निर्णय घेण्यास वेळ आहे, असे खासदार श्री. बारणे यांनी म्हटले आहे.

यावेळी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबकेर, ए.जे. बोराडे, अनिरूद्ध खोतकर यांच्या आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार श्री. बारणे म्हणाले, की पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाअंतर्गत पक्ष बांधणीसाठी आलो आहे. मागील तीन दिवसांमध्ये कार्यकर्त्यांसोबत गट स्थरावर दहा बैठका घेतल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या अपेक्षासह त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या आहेत. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी करायची की नाही ? याचा निर्णय हा स्थानिक पताळीवरील नेत्यांचा आहे. शिवाय मावळ लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीच्या कार्तकर्त्यांकडून दावा केला जात असला तरी लोकसभा निवडणुकीला अजून अवधी आहे. त्यामुळे त्या दाव्याला फार महत्त्व देण्याची गजर नाही. मावळसह जालना लोकसभा मतदार संघासंदर्भात निर्णय घेण्यास अजून वेळ आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे ही यावेळी शिवसेनेचे खासदार श्री. बारणे यांनी यावेळी म्हटले.

कार्यकर्त्यांकडून तक्रारी

महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षांच्या मंत्र्यांसह नेत्यांसंदर्भात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर त्यांना कशापद्धीने त्रासासह संकटाना तोंड द्यावे लागते, याचा पाडाही कार्यकर्त्यांनी वाचला आहे. दरम्यान कार्यकर्त्यांसोबात झालेल्या बैठकांमधील चर्चेचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार असल्याचे यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT