छत्रपती संभाजीनगर

गाडी दुभाजकाला धडकली तरुण व्यावसायिक ठार 

संताेष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : जालना शहरातून घरी पोहचत असतांना भरधाव वेगात असलेल्या गाडीचा ताब सुटुन झालेल्या अपघातात तरुण व्यावसायिक ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता.18) रात्री बाराच्या सुमारास जालना महामार्गावरील सटाणा फाटयाजवळ घडली. 

अपघातात शेख जाकीर शेख बाबुलाल (30, रा. शामवाडी ता. औरंगाबाद) यांचा मृत्यू झाला. तर शेख वजीर शेख जमीर (32) व अय्युबखान अब्दुलखान (55 रा. माहोली ता. औरंगाबाद) हे दोघे जण किरकोळ जखमी झाले. जालना येथुन हे व्यापारी आपल्या सफारीने शहर पळशी शहर (ता.औरंगाबाद) कडे जात होते. रात्री बाराच्या सुमारास सटाणा पाटीजवळ ही सफारी भरधाव वेगाने महामार्गावरील रस्ता दुभाजकाला धडकली.

घटनेनंतर करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी उपचारार्थ दाखल शेख झाकीर यास डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. इतर दोन किरकोळ जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बीट जमादार गंगाधर भताने यांनी दिली.

क्लिक करा : चिवटी' गाजवतोय विविध फिल्म फेस्टिव्हल

108 गाडी आलीच नाही 

प्रत्यक्षदर्शीनी जखमींनी गाडीतून बाहेर काढले. यातील एक जण मृत झाला होता तर दोघे जखमी होते जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यासाठी 108 क्रमांकावर फोन करण्यात आला. फोन उचलणाऱ्याने येतो असे सांगितले मात्र एक तास झाला तरी गाडी आली नाही. शेवटी येथील लोकांनी औरंगाबादडे येणाऱ्या गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र कुणाच जखमींना गाडीत घेतले नाही. त्यानंतर एक शव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवुन तिघांना औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT